💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे आद्यपत्रकार तथा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची २११ वी जयंती उत्साहात साजरी...!


💥यावेळी ताडकळस पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर तरडे यांची प्रामुख्याने उपस्थिती💥 

पुर्णा (दि.२० फेब्रुवारी) - पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज सोमवार दि.२० फेब्रुवारी रोजी आद्य पत्रकार,दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची २११ वी जयंती दिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

यावेळी ताडकळस पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर तरडे ,पोलीस कर्मचारी सुनील गरूड ,सोळंके ,ताडकळस मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जवळेकर(स्वामी) ,उपाध्यक्ष फेरोज पठाण ,कोषाध्यक्ष देवानंद नावकिकर ,बाळासाहेब राऊत ,गजानन नाईकवाडे ,नाना पवार ,शेळके ,अतुल कदम ,अश्रोबा यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या