💥धनादेश न वटल्याने जिंतूर कोर्टाने आरोपीस एक वर्ष कैद तर धनादेश रक्कम 1,20,000/- रुपये दंड म्हणून ठोठावला...!


💥या कामी स्वतः फिर्यादी पक्षाने कोर्टात बाजू मांडली💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर :- येथील कोर्टाने एकास धनादेश न वाटल्याच्या कारणाने एक वर्ष साधी कैद व धनादेश रक्कम  1,20,000 रुपये दंड ठेवला असून या कामी स्वतः फिर्यादी पक्षाने कोर्टात बाजू मांडली.

याबाबत माहिती अशी की कुमार मसाजी घनसावंध यांनी जगन्नाथ गलसिंग राठोड विरुद्ध कलम 138 पराक्राम्य लेख अधिनियम 1881 व कलम 420, 415 भारतीय दंड विधान संहिता 1860 आन्वये आरोपी जगन्नाथ गलसिंग राठोड यांना सदर केसाच्या गुणदोषावरून एक वर्ष साधा कारवास व धनादेश तील रक्कम 1,20,000 रुपये एवढा दंड म्हणून माननीय न्यायाधीश एम.आर. पन्हाड यांनी खुल्या न्यायालयामध्ये ॲड. कुमार घनसावंत यांच्या बाजूने न्याय निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी घोषित केला.

या कामी फिर्यादी कुमार घनसावंध यांच्या वतीने त्यांनी स्वतः सदर प्रकरणांमध्ये वकील म्हणून काम पाहण्यासाठी न्यायालयास विनंती अर्ज करून तो मंजूर केल्यानंतर फिर्यादीने आपली बाजू मांडली व आरोपीतर्फे ॲड. अनिल पवळे यांनी काम पाहिले तर ॲड. कुमार घनसावंध यांना मदतनीस म्हणून ॲड. बाळासाहेब विक्रम घनसावंध यांनी परिश्रम घेतले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या