💥शिरपूर येथे दुसऱ्याच्या नावे सोशल मिडीयाचा गैरवापर करून शांतता बिघडविण्याचा प्रयत्न...!


💥या प्रकरणातील संशयीत आरोपी पोलिसांच्या ताब्यात💥

वाशिम : नुकताच शिरपूर येथे एका विशिष्ट समाजाच्या व्यक्तीच्या नावे इंस्टाग्रामवर खोटे सोशल मिडिया अकाऊंट उघडून त्याद्वारे दुसऱ्या समाजाविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

  पो.स्टे.शिरपूर येथे एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावत सामाजिक तेढ निर्माण निर्माण करणारी इंस्टाग्राम पोस्ट सोशल मिडिया अकाऊंटवरून करण्यात आली अश्या फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून आरोपीविरुद्ध १५३ अ, २९५ अ, ५०५ (२) भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी तपास केला असता  सदर गुन्ह्यात मुख्य आरोपी नामे मंगेश राजू इंगोले, वय २० वर्षे, रा.शिरपूर याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरु आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी यास विचारपूस केली असता आरोपीने इतर दोन व्यक्तींसोबत असलेल्या वैयक्तिक वादातून त्यांना त्रास व्हावा या उद्देश्याने त्यांचा नावाचे दोन फेक इंस्टाग्राम अकाऊंट तयार करून सदर आक्षेपार्ह पोस्ट/स्टोरी अपलोड केल्याचे निष्पन्न होत आहे.

   ‘सध्याच्या घडीला सोशल मिडीयावर कुठलीही चांगली किंवा वाईट पोस्ट तयार करून प्रसारित करणे सोपे झाले असून त्यामुळे नागरिकांनी कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट निदर्शनास आल्यास त्यावर लगेच प्रतिक्रिया न देता सदर बाब पोलीसांच्या निदर्शनास आणून द्यावी व सामाजिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यास पुढाकार घ्यावा.’ असे प्रतिपादन मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी केले आहे.

    सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम श्री.सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली व सपोनि.संदीप नरसाळे, सायबर सेल, वाशिम यांच्या तांत्रिक सहाय्याने पो.नि.सुनील वानखडे, पोलीस स्टेशन शिरपूर हे करीत आहेत. नागरिकांनी सोशल मीडियाद्वारे पसरविण्यात येत असलेल्या अफवांवर/पोस्टवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशीम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या