💥परभणी जिल्ह्यात शिष्यवृत्तीधारकांसाठी तालुकास्तरीय विशेष शिबिराचे आयोजन....!


💥केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क प्रतीपूर्ती योजनेसाठी पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या अर्ज नोंदणी💥

परभणी (दि.१० जानेवारी) : शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मधील प्रवेशित व केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क प्रतीपूर्ती योजनेसाठी पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या अर्ज नोंदणी, छाननी आणि पडताळणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी सोडविणे आणि सर्व महाविद्यालयांमध्ये समानसंधी केंद्र स्थापन करण्यासाठी जिल्ह्यात तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संबंधितांनी या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे.

            मानवत वगळता सर्व तालुकास्तरीय शिबीर हे सकाळी ११.३० वाजता आयोजित केले आहे. हे शिबिर बुधवार, दि. ११ जानेवारीपासून सुरु होत असून, सेलू येथील नूतन महाविद्यालय, गुरुवार (दि. १२) रोजी कृषि महाविद्यालय, पाथरी, तर दुपारी २ वाजता के. के. एम. महाविद्यालय मानवत येथे आयोजित करण्यात आले आहे शुक्रवार, (दि. १३) रोजी गंगाखेड आणि पालम तालुक्याचे संत जनाबाई महाविद्यालय, सोमवार, (दि. १६) रोजी जिजामाता पब्लीक स्कूल, विटा रोड, सोनपेठ, मंगळवार, (दि. १७) रोजी ज्ञानोपासक‍ महाविद्यालय, येलदरी रोड जिंतूर, बुधवार, (दि.१८) ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी आणि गुरुवार, (दि.१९) श्री.गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालय पुर्णा येथे‍ सकाळी ११.३० वाजता शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.    

शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मध्ये प्रवेश घेणाऱ्या व केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क प्रतीपूर्ती योजनेसाठी पात्र अनुसूचित जाती विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाडीबीटी प्रणाली सुरु झाली असून ऑनलाईन प्रणाली व अर्ज नोंदणी तसेच पडताळणी करुन समाजकल्याण कार्यालयाच्या लॉगीनवर अग्रेषित करण्याबाबत सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून प्राचार्यांना कळविण्यात आले आहे.

तरी उपरोक्त तालुकानिहाय शिबिरास संबंधित तालुक्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व शिष्यवृत्तीचे कामकाज पाहणारे कर्मचारी यांनी नियोजित शिबीर स्थळी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या