💥अभिनेत्री राखी सावंतला अटक ; शर्लिन चोप्राचा फोटो व व्हिडिओ केला होता व्हायरल....!


💥एका मॉडेलचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोपाखाली राखी सावंतला अटक💥

✍️ मोहन चौकेकर 

बॉलिवूड 'ड्रामा क्वीन’ म्हणून प्रसिद्ध आणि नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री राखी सावंत हीला आंबोली पोलिसांनी अटक केली गेली आहे. एका मॉडेलचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोपाखाली राखी सावंतला अटक करण्यात आल्याचे समजत आहे.

अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राने ट्विट करत माहीती दिली की, "आंबोली पोलिसांनी एफआयआर 883/2022 संबंधी राखी सावंतला अटक केली आहे. काल राखी सावंतचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे", असं शर्लिनने म्हटलं आहे.

अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राच्या तक्रारीनंतरच आंबोली पोलिसांनी राखी सावंतला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. आता राखी सावंतला अंधेरी कोर्टात हजर केलं जाणार आहे. तिला पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात येईल, याबाबत चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.

 अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राने ट्विट करत एफआयआरविषयीही माहिती दिली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये शार्लिन चोप्राने पत्रकार परिषद घेतली होती. "राखी सावंतने अश्लील व्हिडिओ सर्वांसमोर दाखवल्याचा आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप शर्लिनने केला होता. तसेच पोलिसांत राखीविरुद्ध तक्रारही नोंदवली होती" असे तीने सांगितले....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या