💥परभणी जिल्हा परिषदेअंतर्गत वादग्रस्त शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे अखेर कार्यमुक्त....!


💥उपशिक्षणाधिकारी श्रीपाद देशपांडे यांच्याकडे आज मंगळवार दि.२४ जानेवारी रोजी सकाळी या पदाचा पदभार सुपूर्द💥 

परभणी (दि.२४ जानेवारी) : परभणी जिल्हा परिषदेअंतर्गत वादग्रस्त शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी सोमवारी दूपारी कार्यमुक्त केले . 

दरम्यान परभणी जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून या विभागातील उपशिक्षणाधिकारी श्रीपाद देशपांडे यांना मंगळवारी सकाळी या पदाचा पदभार सुपूर्द केला. औरंगाबाद येथील शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी सोमवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मून यांना मोबाईलद्वारे शिक्षणाधिकारी भुसारे यांना प्रशासकीय कामासाठी तात्काळ कार्यमुक्त करावे अशा तोंडी सूचना दिल्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केली.


प्राथमिक शिक्षणाधिकारी भुसारे यांची शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्तीचा विषयचं वादग्रस्त ठरला होता, त्या पाठोपाठ परभणी जिल्ह्यातील कारकिर्दीतील शिक्षक भरती,शेकडो वैयक्तिक मान्यता, सेवा सातत्य,शालार्थ आयडी नियमबाह्य पद्धतीने केल्यासह असंख्य तक्रारी सरकार दरबारी नोंदविल्या गेल्या . त्यानंतरच शिक्षण खात्याने भुसारे यांच्या विरोधात उच्चस्तरीय समिती नियुक्त करीत चौकशी सुरू केली. यात चवणे समिती, साबळे समिती व अत्तर समिती या तीन उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील समित्यांनी तपासणी करीत बेकायदेशीर नियुक्त्या, प्रचंड गैरप्रकार व अनागोदी विरोधात शासन दरबारी अहवाल सादर केला. 

या पार्श्वभूमीवरच शिक्षणाधिकारी भुसारे यांना शिक्षण विभागाने मंगळवारी सकाळी कार्यमुक्त केले.त्यांच्याकडील पदभार उपशिक्षणाधिकारी देशपांडे यांना सुपूर्त केला. दरम्यान या कारवाईने परभणी जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षण विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या