💥जिंतूर औंढा रोडवर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चालकांने टँकर चालकाला केली मारहाण...!


💥टँकर चालक राजू बंडू घुगे यांच्या फिर्यादी वरुन पोलिस स्थानकात गुन्हा दाखल💥

जिंतूर प्रतिनिधी  / बि.डी.रामपूरकर

जिंतूर औंढा रोडवर टँकर चालकास उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चालकाने टँकर चालकास रस्त्यात गाडी आडवी करून टँकर चालकाला थापड बुक्क्याने मारहाण व शिवीगाळ केली असल्याचा टँकर चालकाचा आरोप.

याबाबत सविस्तर माहिती अशी की जिंतूर औंढा रोडवर चालक राजू बंडू घुगे राहणार टाकळखोपा ता. जिंतूर हा मुंबई येथून टँकर घेऊन गाडी क्रमांक MH 03- CV.9402   तेलंगणात जात असताना 7 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी जिंतूर औंढा रोडवरील लिंबाळा ते आडगाव फाटा  रस्त्यावर अचानक टाटा सुमो गोल्ड गाडी आडवी झाली. त्यांना टँकर चालकांनी गाडी आडवी का लावली? असे विचारले असता व टँकरमधून खाली उतरलो असता गाडींच्या चालकाने मला थापड बुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केली त्या गाडीवर महाराष्ट्र शासनाचा लाल दिवा असून मागच्या साईडने SDM असे लिहिले होते. हा मारहाण करत असताना रस्त्यावर गर्दी जमा झाल्याने एक बस थांबली व त्यातील प्रवाशांनी भांडण सोडवली. अशी तक्रार जिंतूर पोलिस ठाणे येथे 8/1/2023 रोजी भादवी कलम 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असुन अद्यापही कोनत्या SDMची गाडी वचालक कोन? बातमी लीहीपर्यंत समजले नाही....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या