💥पत्रकार मित्रांनो...लक्षात ठेवा तुमच्या एकजुटीची वज्रमुठच लोकशाहीचे ठोकशाहीत होणारे रुपांतर रोखू शकते....!


💥अन् मग तेव्हाच अशी मानुसकीचे भान विसरलेली मंडळी पत्रकारांना सन्मानाची वागणूक देतात💥


✍🏻शोध आणि बोध :- चौधरी दिनेश (रणजीत)

पत्रकार मित्रांनो एक गोष्ट निश्चितच लक्षात ठेवा जेव्हा सुधारणेचा वसा घेतलेली आपल्या सारखी जनहीतवादी बुध्दीजिवी मानस अगदी निर्मळ मनाने एकजूट होतात तेव्हाच भ्रष्ट बेईमान शासकीय/निमशासकीय/बुध्दीभ्रष्ट राजकारण्यांची टाळकी ठिकाण्यावर येतात अन् मग तेव्हाच अशी मानुसकीचे भान विसरलेली मंडळी पत्रकारांना सन्मानाची वागणूक देतात...पारतंत्र्यात असतांना देखील अत्याचारी ब्रिटीश सत्ताधाऱ्यांना दर्पण अर्थात आरसा दाखवण्याचे काम मराठी पत्रकारीतेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केले तर महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कोट्यावधी दिन दुबळ्या सोशीत वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी 'मुकनायक' वर्तमानपत्राची सुरुवात करुन निर्भिड जनहीतवादी पत्रकारीतेची खऱ्या अर्थाने सुरुवात केली मग आम्ही तर देश स्वातंत्र्य झाल्यावर देखील लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पारतंत्र्यात असल्यागत भ्रष्ट बेईमानांच्या ताटाखालील मांजरा प्रमाणे वावरतोय मग ही बुध्दीभ्रष्ट झालेली शासकीय/निमशासकीय/राजकीय बेईमानांची जमात तुम्हाला सन्मान काय म्हणून देणार ? लक्षात ठेवा तुमच्या एकजुटीची वज्रमुठच लोकशाहीचे ठोकशाहीत होणारे रुपांतर रोखू शकते....


आज ०६ जानेवारी 'दर्पण दिन' अर्थात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो राज्यात सर्वत्र 'दर्पण दिन' प्रशासकीय कार्यालयांमध्ये साजरा होत असतांना परभणी जिल्हा व पुर्णा तालुका मात्र अपवाद ठरला पत्रकार दिनाचे औचित्य साधून प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी तर सोडाच एकाही राजकीय पदाधिकारी/लोकप्रतिनिधीने पत्रकारांना सन्मानीत का केले नाही ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वेळ आता जिल्ह्यातील प्रत्येक जनहीतवादी निर्भिड पत्रकारांवर आलेली आहे........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या