💥बीज माता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार जाहीर...!


💥राहीबाईंचे कार्य लक्षात घेता अनेक पुरस्कारां सह बिबीसी वर्ल्ड ने १०० प्रतिभावान महिलांच्या यादीत ही त्यांचा समावेश केला💥

परभणी येथील कै.सौ.कमलताई जामकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा दर्पण पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावातील बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना जाहीर झाला आहे.

            महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री भारत भूषण रावसाहेब जामकर यांनी आपल्या सुविद्य पत्नी  कै.सौ. कमलताई जामकर यांच्या नावे सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलेला दर्पण पुरस्कार देण्याचे ठरविले .तेव्हापासून आजतागायत ही परंपरा सुरू आहे. पुरस्काराचे हे २० वे वर्ष आहे. यापूर्वी साहित्यिक रेखा बैजल ,डॉ. वृषाली किन्हाळकर, सिंधुताई सपकाळ, राणी बंग, डॉ.हेमलता पाटील ,ॲड.सुरेखा दळवी, अपंग पुनर्वसन कार्यकर्त्या नसीमा हुरजूक, वैशाली पाटील, प्रतिभा शिंदे, साधना झाडबुके, डॉ.मंदाताई आमटे, मायाताई सोरटे, रहमत बी मिर्झा , उत्तर प्रदेशच्या गुलाबी गॅंगच्या सुमन सिंह आणि मिठू देवी, सुलोचना कडू, आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेपाळच्या अनुराधा कोईराला, डॉ. ज्योत्स्ना कुकडे, श्रीमती पिंजारीबाई पावरा यांना प्रदान करण्यात आला.

      २० व्या पुरस्काराच्या मानकरी राहीबाई पोपेरे यांनी प्रतिकुल परिस्थितीत शेतात राबत असताना रसायनाचा अतिरेकी वापरातून उत्पन्न वाढले तरी शेती आणि शेतकरी परिवार रसायनाच्या अतिवापरामुळे  घरातील वाढते आजारपण त्यामुळे दवाखान्यावर होणारा बेसुमार खर्च याचा अभ्यास करुन संकरित वाणाचे उत्पादन जास्त असले तरी उत्पादन खर्च ही मोठा आहे.त्याचा आरोग्या वर होणारा विपरित परिणाम लक्षात घेत राहीबाईंनी घराच्या परसबागेत गावरान भाजीपाला लागवड खाण्यासाठी करायला सुरुवात केली. त्यांना परसबाग उभारणी साठी जनरल मिल्स पुरस्कृत व बायफ संस्था संचलित आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत मदत करण्यात आली.राहीबाईंना चिकू,आंबा,सिताफळ,हादगा,शेवगा,लिंबू,पपई, कढीपत्ता, अंजीर अशी फळझाडे पुरविण्यात आली.पाणी नसल्याने बायफ च्या कृषी तज्ज्ञांनी दगडापासून झाडाच्या बुंध्यापर्यंत सभोवती दगडापासूनचे आच्छादन करण्याचा सल्ला दिला.या मुळे कमी पाण्यात ही झाडे तग धरु लागली.परसबाग वाढीसाठी हे नियोजन उपकारक ठरत गेले.राहीबाई तनमनानं परसबागेत रमू लागल्या.हळूहळू पारंपरिक देशी वाणाच्या बियाणांचा संग्रह त्या करु लागल्या.अशा रितीने राहीबाईंचा परिवार पुन्हा देशी गावरान पीका कडे वळला . बियाणे साठवण्यासाठी गाडगी,मडकी,कणग्या,बळद,शेणानं लिपलेली वेलाची टोपली आदींचा वापर सुरू केला.राहीबाईं कडे सुमारे ५४ प्रकारचे पीकं आणि ११६ अस्सल देशी गावरान बीयांचे वाण ,लाल आणि पावटा च्ये २० प्रकार,हे सर्व हवेच्या ओलांव्यावर येणारे प्रोटीन युक्त असे वाण आहेत.संपूर्ण माहिती सह उपलब्ध आहे.या पारंपरिक देशी वाणांचे ज्ञान व बियाणे संग्रह यांची सविस्तर माहिती व नोंद घेवून त्यांच्या राहत्या घराच्या एका खोलीत बियाणे ( बीज ) बॅंक आहे.त्या माध्यमातून आज ही राहीबाई पोपेरे या पारंपरिक देशी गावरान बीज वाणांचा प्रचार प्रसार करीत आहेत.

पैशाच्या बॅंके प्रमाणे बियाणांची गावोगावी बॅंक निर्माण झाली पाहिजे हा ध्यास घेत राहीबाईंचे कार्य लक्षात घेता अनेक पुरस्कारां सह बी.बी.सी वर्ल्ड ने १०० प्रतिभावान महिलांच्या यादीत ही त्यांचा समावेश केला आहे.भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले.अशा कर्तृत्ववान महिलेला २० व्या कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्काराच्या मानकरी म्हणून कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष हेमंत जामकर , उपाध्यक्ष ॲड.बाळासाहेब जामकर,सचिव विजय जामकर, सहसचिव अनिल मोरे यांनी निवड झाल्याचे प्रसिद्धपञकाव्दारे कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या