💥जिंतूर येथे डॉ.विठ्ठल लहाने यांच्या उपस्थितीत रंगणार 'जिंतूर रत्न' पुरस्कार वितरण सोहळा....!


💥यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.विठ्ठल लहाने हे 'एका संधीची गोष्ट' या विषयावर व्याख्यान देणार आहेत💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.07 जानेवारी) - जिंतूरच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहित करण्यासाठी, जिंतूर विकास चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे दिले जाणारे 'जिंतूर रत्न' आणि 'जिंतूर युवारत्न' पुरस्कार घोषित झाले असून, पुरस्कार वितरण सोहळा जगप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन व सुप्रसिद्ध वक्ते डॉ.विठ्ठल लहाने यांच्या उपस्थितीत दि. 8 जानेवारी 2023, रविवार रोजी, सकाळी 11 वाजता जिंतूर येथील माऊली मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याचं अध्यक्षस्थान शिक्षणाधिकारी श्री.विठ्ठल भुसारे सर भूषवणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विठ्ठल लहाने हे 'एका संधीची गोष्ट' या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

          पुरस्कारांचे हे तिसरे वर्ष असून 2022 वर्षाचा 'जिंतूर रत्न' पुरस्कार ज्याचे स्वरूप रू. 11001/- रोख, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे असून तो गॅंगमनकार, प्रा. सदानंद पुंडगे यांना जाहीर झाला आहे आणि 'जिंतूर युवारत्न' पुरस्कार ज्याचे स्वरूप रु. 5001/- रोख, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे असून तो सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक, श्री. प्रताप जगताप (देशमुख) यांना जाहीर झाला आहे.

           पुरस्कार विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच 'एका संधीची गोष्ट' ऐकण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, पालकांनी व नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिंतूर विकास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. सुनिल शिवाजीराव बुधवंत, उपाध्यक्ष श्री. बलराम श्यामसुंदर सोनी व सचिव स्नेहा शिवाजीराव काकड यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या