💥पुर्णेतील व्यापारपेठेकडे ग्रामीण भागातील ग्राहकांनी फिरवली अक्षरशः पाठ....!


💥संक्रात सनाच्या वेळेला देखील व्यापाऱ्यांना पाहावी लागत आहे ग्राहकांची आतुरतेने वाट💥

✍🏻 चौधरी दिनेश (रणजीत) : भयान वास्तव.....

पुर्णा (दि.१२ जानेवारी) - नैतिकतेला बगल देऊन कळत नकळत अनैतिकतेचे समर्थन करणे किती भयावह असते याची यत्किंचितही कल्पना नसलेल्या पुर्णा तालुक्यातील व्यापारी लोकप्रतिनिधी अन् तथाकथित समाज सुधारक मंडळींना आज पुर्णेच्या झालेल्या दयनीय परिस्थिती वरुन कदाचित् जाणीव होतच असेल यावर देखील परिस्थितीची जाणीव संबंधित मंडळींना होत नसेल तर मग त्यांची निद्रावस्था अक्षरशः कुंभकर्णाला देखील लाजवल्या शिवाय राहणार नाही एवढे मात्र निश्चित म्हणावे लागेल. 


 परभणी जिल्ह्यात पुर्णा तालुका हा पुर्वी इतर तालुक्यांच्या तुलनेत अत्यंत सधन तालुका म्हणून ओळखला जात होता तब्बल ९६ गावांचा समावेश असलेल्या पुर्णा तालुक्यात व्यापार उद्योगांसह कृषी क्षेत्राला देखील सोन्याचे दिवस लाभलेले होते परंतु आज घडीला व्यापार उद्योगांसह कृषी क्षेत्राचा सखोल अभ्यास केल्या तालुक्यातील साडे तिन दशका पुर्वीचे बंद पडलेले उद्योग अर्थात चार ते पाच ऑईल मिल,दोन/तिन पोहा मुरमुरा मिल,चार/पाच कॉटन मिलसह मराठवाड्यातील सर्वात मोठे व महत्वाचे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुर्णा रेल्वे स्थानकावरील नांदेड येथे स्थलांतरीत झालेली रेल्वेची अत्यंत महत्वाची कार्यालय उद्योग क्षेत्राच्या झालेल्या भयावह अवस्थेची जाणीव तर करुण देतच आहे त्याही पेक्षा दुर्दैवी अवस्था कृषी क्षेत्राची झाल्याचे निदर्शनास येत असून पुर्णा-गोदावरी या महत्वाच्या ओसंबडून वाहणाऱ्या नद्यांनी वेढलेल्या या पुर्णा तालुक्यातील कृषी क्षेत्र तिन दशकापुर्वी अत्यंत सुजलाम सुफलाम होते परंतु आजची परिस्थिती बघितल्यास कृषी उद्योगासाठी संजीवनी ठरलेल्या या दोन नद्यांवर अक्षरशः गौण खनिज रेती माफियांच्या टोळ्यांनी तांडवनृत्य सुरु केल्यामुळे नद्यांची पात्र रेती अभावी कोरडीठक्क पडल्यामुळे याचा परिणाम कृषी उद्योगावर झाल्यामुळे तालुक्यातील कृषी उद्योगाला उतरती कळा आली असून या भयावह परिस्थितीचा सर्वात मोठा परिणाम व्यापारपेठेवर देखील झाल्याचे दिसत असून पुर्णेची एकेकाळी गजबजलेली व्यापारपेठ आजच्या घडीला मात्र ओस पडल्याचे दिसत असून व्यापाऱ्यांवर ऐन सनासुदीच्या वेळेला ग्राहकां अभावी माश्या मारण्याची वेळ आल्याचे पाहावयास मिळत असून या परिस्थितीला शेवटी जवाबदार कोण ? या प्रश्नाचे उत्तर आज शोधण्याची वेळ प्रत्येक सदविवेक बुध्दीच्या पुर्णेकर मंडळींवर येऊन ठेपलेली आहे. 


परभणी जिल्ह्यात व्यापार उद्योग तसेच कृषी क्षेत्रात सर्वात आघाडीवर असलेला पुर्णा तालुका आज अनैतिक व्यवसायांमध्ये हळुवारपणे मोठ्या प्रमाणात आघाडी घेत असल्याचे निदर्शनास येत असून तालुक्यात पहाता पहात मोठ्या प्रमाणात धाब्यांची संख्या वाढतांना दिसत असून खानावळीच्या नावावर चालणाऱ्या धाब्यांतून अवैध देशी/विदेशी दारूंची विक्री,मोबाईल टू मोबाईल मटका,जुगार अड्डे,गौण खनिज अर्थात अवैध रेती/दगड/माती/मुरुम उत्खननासह शेकडो वाहनांतून तस्करी गुटखा/गांजासह अन्य नशील्या पदार्थांची किरकोळ/होलसेल विक्रीसह तस्करी आदी अनैतिक व्यवसायांत आघाडी घेत असल्यामुळे वेळोवेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे देखील असंख्य गावांतील ग्राहकांसह/व्यवसाईकांनी पुर्णा व्यापारपेठेकडे पाठ फिरवल्याचे देखील एक महत्वाचे कारण असल्याचे जनसामान्यांतून बोलले जात असून पुर्णा तालुक्यात एरंडेश्वर,गौर,कावलगाव,चुडावा,ताडकळस,वझूर अशी एकून ०६ जिल्हा परिषद सर्कल असून तालुक्यात ९६ गाव खेड्यांचा समावेश आहे परंतु यातील एरंडेश्वर जिल्हा परिषद सर्कल मधील अनेक गाव खेड्यातील लोक आपला खरेदी विक्रीचा व्यवहार जवळपास असलेल्या जवळा बाजार,वसमत,परभणी आदी व्यापारपेठांतून करीत आहेत तर कावलगाव जिल्हा परिषद सर्कल मधील अनेक गाव खेड्यातील लोक आपला खरेदी विक्रीचा व्यवहार जवळपास असलेल्या नांदेड व्यापारपेठेतून करीत आहेत तर वजूर जिल्हा परिषद सर्कल मधील अनेक गाव खेड्यातील लोक आपला खरेदी विक्रीचा व्यवहार जवळपास असलेल्या पालम/परभणी व्यापारपेठेतून तर ताडकळस जिल्हा परिषद सर्कल मधील अनेक गाव खेड्यातील लोक आपला खरेदी विक्रीचा व्यवहार स्थानिक व्यापारपेठेसह परभणी व्यापार पेठेतून तर चुडावा जिल्हा परिषद सर्कल मधील अनेक गाव खेड्यातील लोक आपला खरेदी विक्रीचा व्यवहार जवळपास असलेल्या जवळपास असलेल्या वसमत नांदेड व्यापार पेठेतून करीत असल्यामुळे आता पुर्णा व्यापारपेठेतून गौर जिल्हा परिषद सर्कल मधील अनेक गावांसह अंदाजे २० ते २५ गावातील ग्राहकांसह खरेदी विक्री करणारे किरकोळ व्यापारी आपला किरकोळ स्वरुपाचा व्यवहार करीत असल्यामुळे पुर्णा व्यापारपेठेवर याचा मोठा परिणाम जानवत असून पुर्वी अत्यंत गजबजलेल्या या व्यापारपेठेत ग्राहकाविना अक्षरशः भयान शांतता पसरल्याचे चित्र पहावयास मिळत असल्यामुळे पुर्णेतून अनेक व्यापाऱ्यांनी यापुर्वी अनेक व्यापाऱ्यांनी काढता पाय घेतला असून अनेक व्यापारी इतरत्र स्थलांतरीत होण्याच्या तय्यारीत आहेत. 

पुर्णा शहरातातील व्यापार उद्योगासह तालुक्यातील कृषी उद्योगाला लागलेली ही साडेसाती 'शनीची' नसून ज्यांच्यावर या तालुक्यातील जनसामान्य मतदारांनी विश्वास टाकून त्यांना आपले धनी बनवले त्या अल्पकालावधीत जनसामान्यांचे सोशन करून धनदांडगे झालेल्या लबाड लांडग्यांनीच लावलेली साडेसाती असल्याचे स्पष्ट मत जनसामान्यांतून व्यक्त होतांना दिसत आहे....... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या