💥भारतातील पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना शालेय व्यवस्थापन समिती कडून अभिवादन....!


💥शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णु श्रीहरी भोसले उपाध्यक्ष धम्मपाल यादवराव हानवते यांची प्रमुख उपस्थिती💥


ताडकळस : प्रतिनिधी 

पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथून जवळच असलेलेल्या मौ.सिरकळस येथे दि.३ जानेवारी २०२३  वार मंगळवार रोजी भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची  वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णु श्रीहरी भोसले उपाध्यक्ष धम्मपाल यादवराव हानवते व प्रमुख पाहुणे हरिभाऊ नागोराव भोसले यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सतिश खंदारे, विष्णु राऊत,व माधव भोसले गजानन भोसले, यांच्यासह शाळाचे मुख्याध्यापक महेश पवार, सहशिक्षक बम्रानंद ढगे सर व स्वयम सहशिक्षिका शारदा खंदारे अदीनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी आदींची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सुञसंचालन महेश पवार यांनी केले तर आभारप्रदर्शन बम्रानंद ढगे यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या