💥पुर्णेत महिला शिक्षकांसाठी तालुकास्तरीय उद्बोधन कार्यशाळा : 'मासिक पाळीला' सन्मान मिळायला हवा महिला शिक्षकांचा सूर...!


💥निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव💥


पूर्णा (दि.२२ जानेवारी) -  सावित्री-जिजाऊ महोत्सवानिमित्याने होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्था व शिक्षण विभाग परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने  जिल्हा परिषद शाळा, खाजगी अनुदानित शाळेतील महिला शिक्षकांसाठी  'मासिक पाळी व्यवस्थापन व स्त्रियांचे आरोग्य' या विषयावर तालुकास्तरीय उद्बोधन कार्यशाळा कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पूर्णा येथे घेण्यात आली.  

        'मासिक पाळी व्यवस्थापन' विषयावर जनजागृती व्हावी म्हणून आयोजित सत्रात डॉ सौ आशा चांडक (मासिक पाळी समुपदेशन तज्ञ) व डॉ पवन चांडक यांनी सविस्तर मार्गदर्शन केले मा. गटशिक्षणाधिकारी श्री सूर्यवंशी यांच्या प्रयत्नातून महिला शिक्षीकांसाठीतालुका स्तरावर प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली.  या कार्यशाळेला जवळपास 100 महिला शिक्षीकांनी उपस्थित राहून उस्फुर्त सहभाग नोंदवला गटशिक्षणाधिकारी श्री सूर्यवंशी यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा विषयी माहिती दिली. 

या प्रशिक्षण कार्यशाळेत डॉ सौ आशा चांडक (मासिक पाळी समुपदेशन तज्ञ) यांनी उपस्थित महिला शिक्षकांना प्रशिक्षण देतांना विविध टप्यावर माहिती देतांना ऋतुप्राप्ती झाल्यावर पौगंडावस्थेतील होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळी व्यवस्थापन, पाळी विषयीचे समज, गैरसमज, पाळीतील जननेंद्रियांची स्वच्छता, सॅनिटरी पॅड/सुती कापडाच्या घड्याचा  वापर, त्याची योग्य विल्हेवाट, पाळीत घ्यावयाचा योग्य पोषक आहार, सोबत मासिक पाळीशी संबंधित विविध आरोग्य समस्या, पीसीओएस, अतिरक्तस्राव तसेच पाळीमध्ये वापरण्यासाठी शाश्वत पर्याय अर्थात शोषक म्हणून मेन्स्ट्रुअल कप आदी विषयी मार्गदर्शन केले. 

       तसेच याप्रसंगी संपूर्ण पूर्णा तालुका स्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा एचएआरसी संस्थे तर्फे गौरव करण्यात आला. या स्पर्धेमध्ये पूर्णा तालुक्यातील  300 पेक्ष्या अधिक  विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत मासिक पाळी संदर्भातील विविध विषयांवर सहभाग नोंदवला. 


* पूर्णा तालुका निबंध स्पर्धा :-

प्रथम - श्रुती उत्तमराव काळे - 10 वी जिल्हा परिषद प्रशाला एरंडेश्वर 

द्वितीय - वाघमारे अश्विनी शंकर - कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पूर्णा

तृतीय - कुंता राम सुरनर - जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा ताडकळस 

उत्तेजनार्थ: प्रीती किशन राजघाटोळ - जय जवान जय किसान विद्यालय कावलगाव

* पूर्णा तालुका चित्रकला स्पर्धा :- 

प्रथम: कु प्रांजल निवृत्ती काळे - इयत्ता 10 वी जिल्हा परिषद प्रशाला एरंडेश्वर 

द्वितीय: कु अंकिता मंचक दाढे इयत्ता 9 वी - कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पूर्णा 

तृतीय: दिव्या ब्रह्मनंद शिराळे - जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा फुलकळस 

उत्तेजनार्थ: कु साक्षी साहेबराव जमरान इयत्ता 10 वी - जय जवान जय किसान हायस्कूल कावलगाव 

         या प्रसंगी निबंध व चित्रकला स्पर्धेतील  विजेत्यांना ट्रॉफी, बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर तीन स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. पूर्णा तालुक्यातील एकूण 300 विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. 

        कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ पवन चांडक यांनी केले. सूत्रसंचालन श्री ढाले यांनी केले. तर आभार श्रीमती सोमवंशी यांनी मानले. या प्रसंगी आयोजक एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, डॉ आशा चांडक, गटशिक्षणाधिकारी श्री सूर्यवंशी, विस्तार अधिकारी श्री साबळे व मुख्याध्यापक अर्चना सोमवंशी व पूर्णा तालुक्यातील सर्व शिक्षिका उपस्थित होते या कार्यशाळेसाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयामधील  व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पूर्णा येथील सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या