💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे दर्पण दिन उत्साहात साजरा.....!


💥आद्यपत्रकार आचार्य बाळशास्ञी जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन केले अभिवादन💥 


पुर्णा (दि.०६ जानेवारी) - तालुक्यातील ताडकळस येथे दर्पण दिनानिमित्त आद्यपत्रकार आचार्य बाळशास्ञी जांभेकर यांना अभिवादन कार्यक्रमाचे ताडकळस येथील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद च्या ताडकळस मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जवळेकर(स्वामी) यांच्या वतीने ताडकळस येथील झी.व्ही.क्लिअरिंग मिल येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी दर्पण दिनानिमित्त आद्यपत्रकार आचार्य बाळशास्ञी जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी ताडकळस मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जवळेकर(स्वामी),उपाध्यक्ष फेरोज पठाण,भाजपा चे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी रुद्रवार,शिवहार स्वामी,पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष देवानंद नावकिकर ,सल्लागार शिवाजी शिराळे ,सहसल्लागार धमप्पाल हनवते ,पत्रकार गजानन नाईकवाडे ,प्रताप काळे ,जनार्दन आवरगंड,शमीम पठाण,संतोष कांबळे,नामदेव कनकटे,बाळासाहेब राऊत,रवी कनकटे ,चंद्रकांत शिराळे आदींसह पत्रकार बांधवाची यावेळी उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या