💥पुर्णा तालुक्यातील निळा ग्रामपंचायतीचा प्रजासत्ताक दिनी कौतुकास्पद उपक्रम.....!


💥भारतीय सैन्य दलातील जवानाच्या हस्ते करण्यात आले २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहन💥

पुर्णा (दि.२६ जानेवारी) - पुर्णा तालुक्यात आज २६ जानेवारी २०२३ रोजी सर्वत्र प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असतांना भारतीय सैन्य दलातील आजी/माजी जवानांना सन्मानपुर्वक आमंत्रित करुन त्यांचा यथोचित सन्मान करण्याचा विसर शासकीय/निमशासकीय कार्यालयांसह शाळा/महाविद्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना पडला असतांना मात्र तालुक्यातील मौ.निळा गावातील ग्रामपंचायत प्रशासनाने जम्मु काश्मीर राज्यातील पठाणकोट येथील सिमेवर भारतीय सैन्य दलात कार्यरत व सद्या रजा घेऊन आपल्या मुळ गावी निळा येथे आलेले जवान नामदेव भगवानराव सुर्यवंशी यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय राष्ट्रध्वजाचे सन्मानपुर्वक ध्वजारोहन करीत भारतीय सैन्या प्रती आदर व्यक्त करीत 'प्रजासत्ताक दिन' उत्साहाने साजरा केला.

 यावेळी ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक श्रीमती गिरी मॅडम यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच सौ प्रतिभाताई पाटील सूर्यवंशी उपसरपंच मंचक सुर्यवंशी समवेत माजी उपसरपंच रमेशराव श्रीपतराव सूर्यवंशी सर्व सन्माननीय सदस्य व इतर शालेय विद्यार्थी व सर्व शिक्षक कृषी सहाय्यक वावरे साहेब व समस्त गावकरी मंडळी व शालेय समितीचे अध्यक्ष वसंत सुखी तंटामुक्ती अध्यक्ष विलास बालासाहेब सूर्यवंशी व तसेच सर्व ग्रामस्थ व गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या