💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या....!


💥श्रीमंतांच्या यादीत अदाणींची चौथ्या स्थानी घसरण ; Hindenburg च्या अहवालानंतर मोठा फटका💥

✍️ मोहन चौकेकर

* लांडगे विकले गेले, त्यांचा भाव काय हे सर्वांना माहिती,ठाण्यात जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर रोखठोक हल्ला

* शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाण्यात आले पण 'आनंद आश्रमा'त नाही गेले, कारण आनंद आश्रमावर उभारण्यात आला होता 'बाळासाहेबांची शिवसेना' फलक 

* नितीन देशमुख ACBच्या रडारवर, कुटुंबियांच्या नावे घेतलेल्या संपत्तीचा शोध सुरु

* नाकावाटे दिली जाणारी कोरोनावरील पहिली भारतीय लस आजपासून बाजारात

* तेलंगणाचे 'KCR' महाराष्ट्राच्या राजकारणात! ५ फेब्रुवारीला फुटणार नारळ

* पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! आज मध्य रात्रीपासून बंद राहणार सीएनजी पंप

* श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

* आयटी कंपन्या मंदीच्या छायेत ! आयबीएममधून ३९०० कर्मचाऱ्यांची कपात होणार

* श्रीमंतांच्या यादीत अदाणींची चौथ्या स्थानी घसरण ; Hindenburg च्या अहवालानंतर मोठा फटका !

* 'पठाण'ने 'अवतार'चा विक्रम मोडला; जगभरात पहिल्याच दिवशी केली 100 कोटींची कमाई

* 3 महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती:  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

* कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या नव्हे खूनच : 4 चुलत भावांनीच कुटुंबाला संपवले, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह भीमा नदीत फेकले

* विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा दावा: मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी ठरवले असते, तर 40 आमदारांना रोखले असते

* जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस, भारत जोडो यात्रा थांबली: 27 जानेवारीपासून पुन्हा प्रारंभ होईल, 30 रोजी श्रीनगरमध्ये समारोप

* सिराज बनला जगातील नंबर-1 वनडे गोलंदाज: ICC क्रमवारीत बोल्ट- हेझलवूडला टाकले मागे, फलंदाजी क्रमवारीत गिल विराटच्या पुढे

* शिर्डीला पोहोचला अक्षय कुमार: 'सेल्फी' चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यानंतर घेतले साईबाबांचे आशीर्वाद, चाहत्यांचीही भेट घेतली

* शाहरुख खानच्या पठानने रचला नवा इतिहास; ठरला बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 100 कोटी पार करणारा पहिला बॉलिवूड चित्रपट

* कसबा पेठ, चिंचवड मतदार संघातून भाजपचे उमेदवार ठरले? 1 फेब्रुवारीला होणार उमेदवारांच्या नावाची घोषणा, चंद्रकांत पाटील यांची माहिती

* उपांत्य फेरीत टीम इंडियाचा मार्ग नसेल सोपा, शुक्रवारी न्यूझीलंडसोबत होणार रोमांचक सामना

* औरंगाबाद - मनमाड शटलसह, औरंगाबाद - मुंबई सीएसएमटी आणि औरंगाबाद - मुंबई LTT विशेष रेल्वे 

* मंगळवेढा केसरी स्पर्धा : धनश्री फंड मंगळवेढा केसरी, साक्षी व स्नेहल हिला गोल्ड मेडल, इंटरनॅशनल कुस्ती संकुल तालमीने मारले मैदान

* छातीत दुखू लागल्याने अभिनेता अन्नू कपूर रुग्णालयात दाखल

* मुंबईत इमारतीच्या ४२व्या मजल्यावर मोठी आग; अख्खा फ्लॅट जळून खाक

* महाराष्ट्रात 29 जानेवारी 2023 नंतर थंडीची लाट 

✍️ *मोहन चौकेकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या