💥पुर्णेत प्रतिवर्षी प्रजासत्ताक दिनी थाटात साजरा होणाऱ्या संविधान गौरव सोहळ्यातून रुजत आहे संविधान संस्कृती..!


💥सुप्रसिध्द आंबेडकरी विचारवंत जेष्ठ बहुजन नेते प्रकाश कांबळे यांच्या संकल्पनेतून मागील दोन दशकापासून साजरा होतोय संविधान गौरव सोहळा💥


लेखक : ✍🏻श्रीकांत हिवाळे सर

राज्यातील सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत तथा जेष्ठ बहुजन नेते प्रकाशदादा कांबळे यांच्या संकल्पनेतून मागील दोन दशकापासून सातत्याने बहुजन आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेल्या पूर्णा शहरात मोठ्या जल्लोशात भव्य स्वरुपात भारतीय 'संविधान गौरव सोहळा' प्रतिवर्षी प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी साजरा केला जातो संविधान गौरव सोहळ्याचे औचित्य साधून 'संविधान गौरव सोहळा समिती' व या संविधान गौरव सोहळा समितीचे मुख्य संयोजक प्रकाशदादा कांबळे यांच्याकडून समाज प्रबोधनाच्या दृष्टीने व भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला बहाल केलेल्या संविधाना प्रती जनसामान्यांना हृदयात आदरभाव निर्माण व्हावा या निर्मळ उद्देशाने विविध मान्यवर विचारवंतांच्या व्याख्यानाचे आयोजन करीत अत्यंत व्यापक स्वरूपामध्ये 'संविधान गौरव सोहळा' साजरा केल्या जातो.


राज्यासह देशात सर्वत्र एरवी शासकीय पातळीवर शाळा महाविद्यालयांसह शासकीय कार्यालयांमध्ये 'प्रजासत्ताक दिन' साजरा केला जात असतांना मात्र भारतीय राज्य घटनेचे कोणत्याही प्रकारचे महत्व त्या ठिकाणी विशद केले जात नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.....,प्रजासत्ताक दिनी ३९७ कलम ८ परिशिष्ट असलेली भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्य घटनेच्या अंमलबजावणीची सुरुवात २६ जानेवारी १९५० रोजी झाली त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

खंडप्राय भारत देशाच्या सर्वांगिण प्रगतीसह देशाची एकात्मता व अखंडता सामाजिक राजकीय आर्थिक तसेच स्त्रि/पुरुष समानता या भारतीय संविधान अर्थात राज्यघट मुळेच खऱ्या अर्थाने प्रस्तापित झाली.सामाजिक न्याय शोषित पीडित वंचित कामगार कष्टकरी समुहाला यथोचित न्याय देण्याचे महत्तम काम भारतीय राज्य घटने म्हणजेच भारतीय संविधानाने केले.

* भारतीय राज्य घटना सर्वोत्तम आचार ग्रंथ आहे :-

प्रतेक घरा घरात मध्ये हा सर्वोच्च ग्रंथ गेला पाहिजे भारतातील इतर धार्मिक ग्रंथां प्रमाणे भारतीय संविधानाचे देखील पारायण झाले पाहिजे तरच खऱ्या अर्थानं या देशा मध्ये 'संविधान संस्कृती' निर्माण होऊ शकेल हे काम आहे राज्य कर्त्यांचे लोकप्रतिनिधींचे परंतु दुर्दैवाने त्यांनी ते केले नाही या अत्यंत महत्वपुर्ण कार्याची जर खऱ्या अर्थाने कोणी सुरुवात केली असेल तर ती जेष्ठ आंबेडकरी विचारवंत तथा बहुजन नेते प्रकाशदादा कांबळे यांनी.

भारतीय राज्यघटनेची काटेकोरपणे जर अंमलबजावणी केली असती निश्चितच पणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही या भारत देशांमध्ये खऱ्या अर्थाने निर्माण झाली असती व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील सम्राट अशोकांचे 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' राज्य आले असते व हा देश निश्चितच प्रबुद्ध भारत झाला असता.काळोख्या रात्री मध्ये एखादा तारा चमकावा त्यामुळे पूर्ण आसमंत उजळून निघावा या प्रमाणे सन्माननीय जेष्ठ आंबेडकरी विचारवंत बहुजन नेते प्रकाशदादा कांबळे यांच्या सारखे संविधानावर अगदी हृदयातून प्रेम करणारे नेते व आयुष्यभर संविधानाचा जागर करणारे ई.झेड.खोब्रागडे साहेब यांच्या सारखे ज्येष्ठ सनदी अधिकारी व इतर विचारवंत यांच्या अथक प्रयत्नामधून संविधान संस्कृती रुजत असताना आपणाला दिसत आहे.

मागील दोन दशकापासून आदरणीय प्रकाशदादा कांबळे  व संविधान गौरव समिती सविधनाचा जागर करताना दिसत आहे.भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान ग्रंथ सज विल्याला रथामधून पूर्णा शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक कर्न मधुर वाद्य वृंदा सह नामवंत गायकांच्या वानी मधून संविधानाची महती गाणारे महामनव तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन वादी समाज सुधारक महापुरुष यांची प्रेरणादायी गीते सादर सादर केली जातात.हजारो श्रद्धा संपन्न संविधान प्रेमी माता भगिनी युवक युवती आबाल वृद्ध सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर पांढऱ्या शुभ्र पोशाखामध्ये संविधान रॅलीमध्ये सहभागी होतात.

अशा प्रकारचा नयन मनोहर भारतीय संविधानाविषयी प्रेम अस्था दाखव नार चित्र भारतामध्ये बहुदा कुठेही पहावयास मिळणार नाही.भारतीय संविधान रॅलीचा समारोप डॉक्टर आंबेडकर नगर येथून भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली महापुरुषांच्या प्रतिमेला व संविधानाला अभिवादन करून सुरुवात होते शहरातील प्रमुख मार्गावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी जाहीर सभेमध्ये या रलीचे रूपांतर होते हे संविधान गौरव सोहळ्याचे 21 वे वर्ष  भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक ज्येष्ठ सनदी सेवानिवृत्त अधिकारी आदरणीय ई झेड खोब्रागडे यांचं प्रमुख व्याख्यान हे या संविधान गौरव सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य असणार आहे.

भारतीय संविधान गौरव सोहळ्यामध्ये दरवर्षी विविध ठराव घेतले जातात व अंमलबजावणीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जातो या बाबीचा सकारात्मक परिणाम आपणास पहावयास मिळाला आहे प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये संविधान प्रस्ताविकेच वाचन भारतीय संविधान दिन साजरा होताना दिसत आहे.भारतीय संविधान गौरव सोहळा समिती पुरणाच्या वतीने स्वातंत्र्यदिनी घर घर तिरंगा हे अभियान राबवण्यात आले होते.तशाच पद्धतीने घर घर मे संविधान अभियान शासनाच्या वतीने राबविण्यात यावे अशा प्रकारची मागणी आहे.भारतीय संविधान गौरव सोहळ्यामध्ये आत्तापर्यंत हजारो संविधानाच्या प्रतीचे वाटप करण्यात आलेल आहे.

या संविधान गौरव सोहळ्यामधून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी संविधान गौरव सोहळे संपन्न होत आहे हे पूर्णा येथील दोन दशकापासून सातत्यपूर्न संपन्न होणाऱ्या संविधान गौरव सोहळ्याचे यश आहे.

भारतीय प्रजाक सत्ताक दिनाच्या व संविधान गौरव सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा मंगल कामना...!

✍🏻श्रीकांत हिवाळे सर

 पूर्णा जी परभणीटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या