💥ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रजनीकांत कौसडीकर मुक्तिसंग्रामाला उजाळा देतात तेव्हा...!


💥मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष : अपर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडून  वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन💥


परभणी (दि.०१ जानेवारी) : आज संपूर्ण देश ज्यांच्या कष्टाने, त्यागाने आणि आत्मबलिदानाने स्वातंत्र्याची गोड फळे चाखत आहे... देशावरील पारतंत्र्याचे जोखड झुगारून भारतमातेला स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेता यावा, यासाठी ज्या अनाम विरांनी आपले जीवन समर्पित केले. अशा त्यागमूर्तींपैकीच एक असलेले परभणी जिल्ह्याचे सुपुत्र ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रजनीकांत मार्तंडराव कौसडीकर यांनी आज मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या स्वातंत्र्यसमराला आज ऊजाळा दिला. निमित्त होते... या जेष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचा ९३ वा वाढदिवस अन् नववर्षारंभाचे.


या क्षणाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासनाकडून अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी त्यांच्या घरी जावून त्यांचा यथोचित सन्मान करत वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले व त्यांना दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यंदा भारतीय स्वातंत्र्याचे व मराठावाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत असून, त्याअंतर्गत अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक रजनीकांत मार्तडराव कौसडीकर यांचे आज ९३ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी जाऊन अभिष्टचिंतन केले. तसेच त्यांना दिर्घायुष्याच्या व नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.  त्याप्रसंगी स्वातंत्र्यसैनिक रजनीकांत कौसडीकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात दिलेला सशस्त्र लढा व जुलमी रझाकार संघटना याबाबतची विस्तृत माहिती देत आठवणींना उजाळा दिला. स्वातंत्र्यसैनिकांच्या होत असलेल्या गौरवामुळे याप्रसंगी उपस्थित असलेले कुटुंबीय भारावून गेले होते. जिल्हा प्रशासनानेही वाढदिवसाचे औचित्य साधत जेष्ठ स्वातंत्र्यसैनिकांप्रती असलेला आदर व्यक्त केला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या