💥जुन्या पिढीतील पत्रकारांची नोंद घेऊन त्यांचा योग्य सन्मान झाला पाहिजे - जेष्ट पत्रकार तथा साहित्यिक आसाराम लोमटे


💥जेष्ठ पत्रकार मदन (बापू) कोल्हे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस आयोजित कार्यक्रमात डॉ.लोमटे यांनी केले प्रतिपादन💥


परभणी - समाजहिताचे ध्येय समोर ठेऊन समाजसेवेचे व्रत घेतलेल्या जुन्या पिढीतील पत्रकारांनी अविरत कष्ट  केलेल्या संघर्षमय जीवनाची समाजाने नोंद घेऊन त्यांचा यथोचित सन्मान केला पाहिजे असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ.आसाराम लोमटे यांनी जेष्ठ पत्रकार मदन (बापू)कोल्हे यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

 येथील गजानन नगर मधील युद्ध कला क्रीडा प्रबोधिनी हाॅलमध्ये दि.१७ जानेवारी २०२३ रोजी वाशिम येथील प्रसिद्ध उद्योगपती मा.गिरधारी रामेश्वरजी सारडा यांचे अध्यक्षतेखाली जेष्ठ पत्रकार मदन (बापू) कोल्हे, संपादक धर्मभूमी, परभणी जिल्हा अध्यक्ष इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन नविदिल्ली, यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.आसाराम लोमटे बोलत होते.


आजच्या सारखे प्रगत तंत्रज्ञान, यंत्र सामग्री उपलब्ध नसतानाही अत्यंत कष्टाने, संघर्षमय वाटचाल करीत त्यांनी पत्रकारीतेमध्ये इतिहास निर्माण केला असल्याचे सांगून त्या काळी अखंड नियमितपणे वृत्तपत्र काढणे ही आश्चर्याची बाब होती,मदन (बापू) कोल्हे यांनी आपले ध्येय, विचारावर ठाम राहून गेले ५० वर्षे संघर्षाची पत्रकारीता करत वयाची पंचाहत्तरी पार केली, त्यांना पुढील दिर्घायुष्य लाभण्यासाठी सर्व पत्रकारांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रमुख पाहुणे 'हाबाडा' चे संपादक ज्येष्ठ पत्रकार राजा पुजारी, जेष्ठ पत्रकार रमाकांत कुळकर्णी, सामाजिक बांधिलकी पत्करून कार्य करणारे प्रेरणादायी आदर्श शिक्षक दि.फ.लोंढे व समाज सुधारक निवृत्ती रेखडगेवार सर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील संशोधक अभियंता, यंत्र माता' डॉ.स्मिता सोळंकी, यांचीही मार्गदर्शक, शुभेच्छा पर भाषणे झाली.


इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन नविदिल्ली चे परभणी जिल्हा मिडिया चिफ तथा सा.वैभवज्वालाचे संपादक देवानंद शंकरराव वाकळे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेला जेष्ठ पत्रकार मदन (बापू)कोल्हे यांचा , सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यात सदैव तन-मन-धनाने अग्रेसर असलेले वाशिम चे प्रसिद्ध उद्योगपती मा.गिरधारीलाल रामेश्वरजी सारडा, जेष्ठ साहित्यिक डॉ.आसारामजी लोमटे, वनाकृवि च्या संशोधक अभियंता डॉ.स्मिता सोलंकी, जेष्ठ पत्रकार रमाकांत कुळकर्णी,'हाबाडा' चे संपादक ज्येष्ठ पत्रकार राजा पुजारी, जेष्ठ समाजसेवक,बार्टी चे माजी समन्वयक दि.फ.लोंढे, सामाजिक नेते निवृत्ती रेखडगेवार सर,वनामकृवि चे प्राचार्य राहुल रामटेके,वुशू कराटे मास्टर तथा लोकव्यथा चे संपादक पांडूरंग अंभोरे , जेष्ठ पत्रकार,सा.जागरुकता चे संपादक मुनवरखान यांचे हस्ते  शाल, पुष्पहार व वाशिम वरुन आणलेला ७५ पुष्पांचा बनवलेला भव्य बुके देऊन सत्कार केला व गौरविण्यात आले,

यावेळी सेनगाव वरुन आलेले मा.मुख्याध्यापक दत्ता तुरनार यांनी मदन कोल्हे यांना ' संविधान ' ची प्रत भेट दिली तर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती रेखडगेवार यांनी 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर' यांची 'माझी आत्मकथा' बालाघाटातील कोळी महादेव व कोळी मल्हार जमाती पुर्वपिठीका, ओबीसी समाज: समस्या व उपाय ही पुस्तके भेट दिली.मदन बापू च्या वाढदिवस सत्कार सोहळयास युवकांचे प्रेरणास्थान दै.धर्मयोध्दा चे संपादक रामेश्वर शिंदे,दै.शिल्पकारचे संपादक भुषण मोरे,पुर्णेचे जेष्ठ पत्रकार विजय कुलदिपके,शब्द धनुष्य चे संपादक दिलीप बोरकर, नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते गंगाधर सावळे, इरा चे गंगाखेड तालुकाध्यक्ष तथा दैनिक शब्दरंग चे संपादक राजेश कांबळे,इरा चे परभणी महानगर अध्यक्ष मयुर मोरे -देशमुख,दै.शब्दरंग चे कार्यकारी संपादक प्रविण मोरे,दै.शिवनेरी पत्र चे संपादक,ॲड.उत्तम काळे , वैभव ज्वाला चे प्रतिनिधी सारीपुत्र यांची उपस्थिती लाभली होती. 

* विजयी खेळाडूंना याच कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान :-

वुशू कराटेच्या राष्ट्रीय पातळीवर हरियाणा येथे झालेल्या स्पर्धेत मेडल्स व पारितोषिके मिळवून सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल विजयी खेळाडूंना याच कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मेडल प्रदान करण्यात आले व त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.या खेळाडूंना ऑलिम्पिक च्या तयारीसाठी रवाना होतांना वाशिम चे उद्योगपती गिरधारीलाल सारडा यांचे तर्फे महाराष्ट्र कराटे असोसिएशन चे सचिव,कराटे मास्टर पांडूरंग अंभोरे यांचा सत्कार करुन सर्व खेळाडूंना उबदार कंबळ (रग) चे वाटप करुन शुभेच्छा देण्यात आल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या