💥पूर्णा शहरात २० व्या बौद्ध धम्म परिषदेला उत्साहात सुरुवात....!


💥धम्म परिषदेची सुरुवात आज उत्तर कोरिया येथील प्रतिनिधींच्या उपस्थितीत झाली💥


पूर्णा (दि.३१ जानेवारी) - पुर्णा शहरात आज मंगळवार दि.३१ जानेवारी रोजी भदंत उपाली थेरो यांच्या ४० व्या स्मृति दिनाच्या निमिताने बुद्ध विहार समिती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांच्या वतीने बुद्ध विहार प्रांगणात दोन दिवशीय बौद्ध धम्म परिषदेच्या आयोजन करण्यात आले होते आज दि.३१ जानेवारी रोजी धम्म परिषदेची सुरुवात उत्तर कोरिया येथील प्रतिनिधीच्या उपस्थितीत झाली.


या निमिताने सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्यास अभिवादन करून धम्मध्वजाचे ध्वजारोहण दक्षिण कोरियाचे डॉ.हाँग जीन सु यांच्या हस्ते करण्यात आले त्या नंतर बुद्ध विहार येथे धम्मध्वजाचे ध्वजारोहण व दुपारी ०१-०० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे धम्म ध्वजारोहण करण्यात आले त्या नतर भबुद्ध व डॉ. बाबासाहेबाच्या प्रतिमांची व भव्य धम्म मिरवणूक काढण्यात आली यामध्ये प्रमुख पाहुणे भिक्खुसंघा श्रामणेर सघाची ढोल लेझीम च्या सुरात काढण्यात आली. विविध देखावे सादरीकरण करण्यात आले त्या नंतर धम्म परिषदेत रुपातर करण्यात आले.


यावेळी डॉ. होग जीन सु डॉ. लीची रॅना वाइस चान्सलर साऊथ कोरिया पार्क जागवे एम जियोग ह्याग क्योग उद्योगपती सी.आर सांगलीकरा डॉ. एस.पी. गायकवाड भदंत ज उपगुप्त महाथेरो, भदंत शरानद महाथेरो प्राचार्य खेमधम्मो महाथेरो, भदंत डॉ. इंदवंश महाथेरो भन्ते पंयाबोधी थेरो, भन्ते मुदितानद थेरो भन्ते पंयानद थेरो, भन्ते पंयाबोधी थेरो भन्ते पंयावंश भन्ते संघ रत्न भन्ते धम्मशिल भन्ते शिलरलभन्ते बोधी धम्मा विभागीय अधिकारी सुधिर पाटील तहसिलदार पल्लवी टेमकर नायब तहसिक दार बोलूले प्राचार्य मोहन मोरो प्रकाश कांबळे उत्तम खंदारे आशोक व्ही काबळे दादाराव पंडित अड हर्षवर्धन गायकवाड अड धम्मा जोंधके अॅड महेद्र गायकवाड मुकूंद भोळा आशोक धबाले विरेश कसबे मधूकर गायकवाड अनिल खरिवराटे दिलीप गायकवाड पी.जी रणवीर इंजि नितीन साळवे मुकूद पाटील आदि उपस्थित होते.


या निमिताने भबुद्ध डॉ. बाबा साहेब आंबेडकरा . च्या प्रतिमाना अभिवादन करून बुद्ध वंदना त्रिशरण पंचशिल ग्रहण करून परिषदेचे उदघाटन करण्यात आले यावेळी हजारो बौद्ध उपासक उपासिका यांची उपस्थिती होती या निमिताने रक्तदान शिबिरा भोजनदान विविध उपक्रम राबविण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शामराव जोगदंडा विजय बगाटे बोध्दाचार्य त्र्यंबक काबळे अतूल गवळी किशोर ढाकरगे राम भालेराव साहेबराव सोनवणे अमृत कऱ्हाळे विजय खंडागळे सुरज जोंधळे उमेश बऱ्हाटे यांच्या सह महिला मंडळाच्या पदाधिकाया नी प्रयत्न केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या