💥प्रभावती नगरीत परम पुज्य पंडीत श्री प्रदीपजी मिश्रा यांचे जल्लोषात स्वागत....!


💥राष्ट्रीय महामार्गावरील पाथरी रस्त्यावर दुपारी 04-00 वाजल्यापासून शिवपुराण कथेला सुरुवात💥

💥लक्ष्मी नगरी भाविकांच्या गर्दीने गजबजली💥

परभणी (दि.13 जानेवारी) : राष्ट्रीय महामार्गावरील पाथरी रस्त्यावर 60 एक्कर मोकळ्या जागेत प.पु. पंडीत श्री प्रदीपजी महाराज मिश्रा यांच्या अमृत वाणीतून भव्य शिवपुराण कथा सोहळा आज सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरु होणार आहे. या कथासोहळ्या निमित्त प.पू.पंडीत श्री प्रदीपजी महाराज मिश्रा यांचे गुरुवारी मध्यरात्री परभणीत आगमन झाले. त्यावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

          शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्य खासदार संजय जाधव यांनी या कथेचे आयोजन केले आहे. या कथेसाठी दररोज लाखो भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. त्या निमित्ताने या कथा सोहळ्याकरीता संयोजन समितीने 165 बाय 700 स्केअर फुटाचा भव्यदिव्य असा मंडप उभारला आहे. जर्मन टेक्नॉलॉजीच्या या डोममध्ये एकही खांब नाही. त्यामुळे मंडपाच्या कानाकोपर्‍यातून, मंडपाच्या बाहेरुनसुध्दा भाविक भक्तांना थेट कथेचे श्रवण करता येणार आहे. या मंडपात भारतीय बैठकी प्रमाणे आसन व्यवस्था करण्यात आली असून विशेष म्हणजे सर्व भाविक भक्तांकरीता याच पध्दतीची व्यवस्था असणार आहे. यात कोणालाही स्वतंत्र असे पासेस वगैरे दिले गेले नाहीत. परंतु, वयोवृध्द किंवा बसू न शकणार्‍या भक्तांसाठीची खूर्चीची व्यवस्था करण्यात आली आहे.

           कथा सोहळ्याकरीता बाहेर गावाहून हजारो भावीक कार्यक्रमस्थळी मुक्कामी दाखल झाले आहेत. या भाविकांसह पंडीत मिश्रा यांच्या सोबतच्या सहकार्‍यांकरीता संयोजन समितीद्वारे स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात आली आहे. जेवणाची व्यवस्थाही नाममात्र दरात करण्यात आली आहे. या भव्यदिव्य सभागृहात भव्य व सुंदर असे व्यासपीठही उभारण्यात आले आहे. या व्यासपीठावर 17 जानेवारीपर्यंत शिवपुराण कथा सोहळा रंगणार आहे.  

           पं.पु. पंडीत श्री प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृत वाणीतून माँ चंद्रभागा शिवपुराण कथेस शहरासह जिल्ह्यातून, अन्य जिल्ह्यातून तसेच राज्याबाहेरुनसुध्दा मोठ्या संख्येने भावीक दाखल होत आहेत. पाथरी रस्त्यावरील लक्ष्मी नगरीतील हा कथा सोहळा सायंकाळी 4 वाजता सुरु होणार असून तो रात्री 7 पर्यंत चालणार आहे.


पंडीत मिश्राजी यांचे जल्लोषात स्वागत...

        पं.पू. पंडीत श्री प्रदीपजी मिश्रा यांचे या कथा सोहळ्या निमित्ताने गुरुवारी रात्री 12 वाजता परभणीत आगमन झाले. त्यावेळी त्यांचे खासदार संजय जाधव यांच्या निवासस्थानी जल्लोषात स्वागत करण्यात आले. जाधव दाम्पत्यासह कुटूंबियांनी पंडीत मिश्रा यांची पाद्यपुजा केली. यावेळी हभप अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पंडीत मिश्रा यांच्यासमवेत शेकडो भक्तगण लक्झरी बसद्वारे दाखल झाले आहेत.


विसावापासून रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे...

         जिंतूर रस्त्यावरील विसावा नाक्यापासून ते लक्ष्मी नगरी तेथून पुढे दंत महाविद्यालयापर्यंत संयोजन समितीद्वारे दुतर्फा पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हा मार्ग उजळून निघाला आहे. भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून संयोजन समितीने कथा मंडप परिसरातही मोठ मोठे टॉवर्स उभारले आहेत.


विविध भागातून मोफत वाहनसेवा

            संयोजन समितीने शहराच्या विविध भागातून भाविकांच्या सोयीकरीता वाहनसेवा सुध्दा इतरांच्या मदतीने तैनात केली आहे.खानापूर नाका, शनिवार बाजार किंवा अन्य ठिकाणांहून लक्ष्मी नगरीपर्यंत ही वाहनसेवा दुपारी व रात्री ये-जा करण्याकरीता उपलब्ध केली आहे. या वाहनसेवेचा भावीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.


शेकडो कार्यकर्ते तैनात; प्रचंड बंदोबस्त

        या भव्यदिव्य कथासोहळ्याकरीता संयोजक तथा खासदार जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते आठ दिवसांपासून अहोरात्र असे परिश्रम करीत आहेत. सर्व व्यवस्था सुसज्ज अशा असाव्यात, कथा सोहळा सुरळीतपणे पार पडावा, प्रत्येक भाविकास या कथा सोहळ्याचा लाभ घेता यावा, तसेच कथा सोहळ्यात शिस्तबध्दपणा असावा, या दृष्टीकोनातून कार्यकर्त्यांनी सर्वतोपरी उपाययोजना केल्या आहेत. खासदार जाधव हे स्वतः त्यावर नियंत्रण ठेवणार आहेत. या व्यतिरिक्त पोलिस यंत्रणेनेही या परिसरात स्वतंत्र कक्ष उभारला असून त्याद्वारे सोहळ्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.


भव्यदिव्य स्क्रिनद्वारे लाईव्ह प्रक्षेपण

         या कथा सोहळ्यात भव्य मंडपात या कथा सोहळ्याचा कानाकोपर्‍यातील लाखो भाविकांना आनंद लूटता यावा, कथेचे श्रवण करता यावे या दृष्टीकोनातून संयोजन समितीने 40 वर  भव्य स्क्रिनची व्यवस्था सुध्दा केली आहे. अत्याधूनिक असे हे स्क्रिन कानाकोपर्‍यापर्यंत कथा सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण करणार आहे. तसेच काही चॅनल्सवरसुध्दा या सोहळ्याचे प्रक्षेपण होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या