💥औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक म्हणून शेखर चन्ने यांची नियुक्ती....!


💥भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये करण्यात आली नियुक्ती💥

परभणी (दि.13 जानेवारी) :- भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये 05- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 च्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक म्हणून शेखर चन्ने (भा.प्र.से.), महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

निवडणूक निरीक्षक शेखर चन्ने यांचे निवास व संपर्क कार्यालय शासकीय सुभेदारी विश्रामगृहातील 'मांजरा' हे असणार आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8956710497 तर दूरध्वनी क्रमांक 0240-299801 असल्याचे  निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या