💥सोनपेठ येथे किशोरवयीन मुलींसाठी आयोजित मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळेस प्रतिसाद....!


💥एचएआरसी संस्थेचा उपक्रम : मासिक पाळी समुपदेशन काळाची गरज - उपशिक्षणाधिकारी शौकत पठाण


💥डॉ.सौ आशा चांडक यांनी केले मार्गदर्शन💥

सोनपेठ (दि.03 जानेवारी) - सोनपेठ येथे आज मंगळवार दि.03 जानेवारी रोजी बालिका दिनानिमित्त तालुकास्तरावर 7 वी ते 12 वितील किशोरवयीन मुलींसाठी 'मासिक पाळी व्यवस्थापन' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन  होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएचआरसी) या संस्थे तर्फे करण्यात आले होते. 


या प्रसंगी जवळपास 1321 किशोरवयीन मुली व शिक्षकांची उपस्थिती होती सकाळी 11-00 ते 02-00 वाजेच्या दरम्यान नगर परिषद सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. या सत्रात नगर परिषद सोनपेठ चे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे उपशिक्षणाधिकारी शौकत पठाण,डॉ पवन चांडक,डॉ सौ आशा चांडक,मुख्याध्यापक गायकवाड उपस्थित होते.  

 प्रस्तावना प्रा पद्मा भालेराव यांनी केली सूत्रसंचालन श्रीमती डोंगरे यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीमती म्हात्रे यांनी मानले. या कार्यक्रमात डॉ सौ आशा चांडक (मासिक पाळी समुपदेशन तज्ञ) यांनी उपस्थित किशोरवयीन मुलींना ऋतुप्राप्ती झाल्यावर पौगंडावस्थेतील होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळी व्यवस्थापन, पाळी विषयीचे समज, गैरसमज, पाळीतील जननेंद्रियांची स्वच्छता, सॅनिटरी पॅड/सुती कापडाच्या घड्याचा  वापर, त्याची योग्य विल्हेवाट, पाळीत घ्यावयाचा योग्य पोषक आहार, सोबत मासिक पाळीशी संबंधित विविध आरोग्य समस्या, पीसीओएस, अतिरक्तस्राव तसेच पाळीमध्ये वापरण्यासाठी शाश्वत पर्याय अर्थात शोषक म्हणून मेन्स्ट्रुअल कप आदी विषयी मार्गदर्शन केले. 


 1000 मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप: या तालुकास्तरीय समुपदेशन सत्रात 1000 किशोरवयीन विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड व 1321 मुलींना मासिक पाळी व्यवस्थापन माहितीपत्रकाचे  वाटप करण्यात आले तसेच मुलींसाठी 'मेन्स्ट्रुपेडिया' या मासिक पाळी विषयक मराठी कॉमिक बुक चे वाटप करण्यात आले ग्रामीण भागातील किशोर वयीन मुलींना मासिक पाळी समुपदेशन व सॅनिटरी पॅड वाटप. आजवर 14 हजार पेक्षा अधिक मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटप तर 20 हजार पेक्षा अधिक मुलीचे मोफत मासिक पाळी विषयावर समुपदेशन केले आहे.

 या तालुकास्तरीय कार्यशाळेच्या यशस्वीततेसाठी डॉ पवन चांडक, डॉ सौ आशा चांडक, प्रा पद्मा भालेराव,  विद्या राठोड, श्रीमती डोंगरे, श्रीमती म्हात्रे, श्रीमती माळी, श्रीमती जाधव, श्रीमती आहेर व श्रीमती बनसोडे सर्व महिला शिक्षकांनी  प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या