💥पुर्णा तालुक्यातील बरबडी येथे एकतर्फी प्रेम प्रकरातील युवकाच्या सततच्या जाचास कंटाळून युवतीने केले विष प्राशन...!


💥पोलिस स्थानकात आरोपी युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल💥

पूर्णा (दि.१० जानेवरी) : तालुक्यातील बरबडी येथे एका  २१ वर्षीय युवतीला यात गावात राहणाऱ्या भावकीतून युवकाने लग्न करण्याचा तकादा लावत बदणामी करण्याची धमकी देत सातत्याने छळ केल्यामुळे या युवकाच्या छळाला कंटाळून शेवटी त्या पिडीत युवतीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली या घटने संदर्भात संबंधित आरोपी युवकावर पूर्णा पोलीस स्थानकात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.

या घटने संदर्भात पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पूर्णा तालुक्यातील बरबडी येथील आरोपी युवक राहुल गिरिधर शिंदे (वय २४) हा युवक आपल्याच भावकीतील २१ वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. तो सातत्याने लग्न करण्याचा तकादा लावत त्या युवतीचा त्रास देत होता़ तू मला खूप आवडतेस माझ्या सोबत लग्न कर म्हणून तो सातत्याने त्रास देता होता़ परंतू ती युवती याकडे दुर्लक्ष करीत होती़ परंतु दि.०८ जानेवारी २०२३ रोजी राहुल शिंदें याने सदर तरूणीस तू माझ्या सोबत लग्न नाही केल्यास मी तुझी बदनामी करील अशी धमकी दिल्याने संबंधीत युवणीने युवकाच्या जाचास कंटाळून विषारी औषध प्राशन केले़ त्या युवतीचा रुग्नालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची तक्रार मयत तरुणीचा भावाने पुर्णा पोलिस स्थानकात रितसर तक्रार दाखल केल्यामुळे आरोपी राहुल शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या