💥समाज लैंगिक समानतेने ग्रस्त आहे आज देशाला बदलाची गरज आहे - यखत्यारखान पठाण


💥असे अभ्यासपूर्ण मत मनपा परभणीचे यखत्यारखान पठाण यांनी मांडले💥

भारत देशात लिंग भेदभाव ही एक सामाजिक समस्याआहे.लिंगभेद आणि पुरुषप्रधानते मुळे महिलांना समाजात दुय्यम दर्जा आहे तो दूर करण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण काळाची गरज आहे.कारण महिला सक्षम झाली तर ती अधिक जागरूक होईल.तिला सामाजिक आणि कायदेशीर दोन्ही पातळीवर आपले व्यक्तित्व अबाधित राखता येईल.या कामी समाजातील पुरुष वर्गाने महिलांबद्दलची आपली विचारसरणी बदलून त्यांच्या प्रती आदराची भावना व्यक्त करुन तिला बरोबरीचे स्थान देत सामाजिक समभावाची रुजवण करावी. लिंगाचा विचार न करता माणूस हा माणूस आहे हा विचार लोकजीवनात रुजविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी समाजात जनजागरणाचे कार्य करावे असे अभ्यासपूर्ण मत मनपा परभणीचे यखत्यारखान पठाण यांनी मांडले.

       युवकांचा ध्यास ग्राम,शहर विकास या थिम वर आधारीत विशेष युवती शिबीर,हसनापूर येथे कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान मनपा परभणी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात यखत्यारखान पठाण बोलत होते.

      व्यासपीठावर अर्जुन झटे,रेखा तपसे, आशा सोनवणे ,गोविंद कपाटे ,प्रा डॉ.नसिम बेगम,प्रा.डॉ.आशा गीरी,प्रा.डॉ.दिनेश धनेश्वर,प्रा.अर्जून सुरवसे, प्रा.कौसर बेगम,प्रकाशराव खरडे, मदनराव खरडे, सदाशिव आप्पा खरडे,उपस्थित होते.

         महिलांनी सामाजिक बंधनातून मुक्त होत, आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे विरुद्ध सनदशीर मार्गाने लढा उभारावा.समान संधी तत्वाचा अवलंब करावा.समान काम समान वेतन कायद्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडावे.असे आवाहन अर्जून झटे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.वैष्णवी वरकड हिने तर आभार कु.सपूरा अन्जूम हिने मानले....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या