💥इटोली ग्रामपंचायत च्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार - सरपंच संगीता घुगे


💥इटोली ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदावर छाया मेनकुदळे यांची बिनविरोध निवड💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या 33 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले  यामध्ये 33 ग्रामपंचायत चे सरपंच जनतेतून निवडून आले आहे. दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी जिंतूर  तहसीलदार यांचे आदेशाने पार पडलेल्या उपसरपंच निवडणुकीत इटोली ग्रामपंचायतच्या छाया मेन कुदळे यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड झाली आहे.


यावेळी नऊ सदस्य पैकी आठ सदस्य व सरपंच नऊ  उपस्थित होते .या निवडणूक कामी निवडणूक निरीक्षक तथा नायब तहसीलदार ज्ञानेश्वर धोंडगे महसूल, निवडणूक सहाय्यक अधिकारी के.डी. सरकटे विस्तार अधिकारी तर ग्रामविकास अधिकारी व्ही. के. कांगणे यांचे समक्ष व सरपंच संगीता जगदीश घुगे यांचे अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत इटोलीं च्या उपसरपंच पदी सौ छाया नवनाथ मेनकुदळे यांची बिनविरोध निवड झाली या निवडीमुळे सर्व सदस्य व सरपंच उपसरपंचांचे वाजत गाजत गुलालाची उधळण करून स्वागत केले. यावेळी उपस्थित त्यांना संबोधताना इटोली ग्रामपंचायत च्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार असून उपसरपंच व सदस्यांना सोबत घेऊन एकजुटीने काम करून ग्रामपंचायत हद्दीतील गावांचा विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असा विश्वास नवनिर्वाचित सरपंच सौ संगीता जगदीश घुगे यांनी यावेळी बोलताना जननायक न्यूज प्रतिनिधीशी व्यक्त केला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या