💥पुर्णेतील भुयारी मार्गासाठी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाने सातत्यपूर्ण दिलेल्या लढ्याला अखेर यश....!


💥अखेर भुयारी मार्गाच्या कामास झाली सुरुवात💥

पूर्णेतील भुयारी मार्गासाठी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा संघटनेनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला शेवटी यश मिळाले असून मागील दिड ते दोन वर्षांपासून नांदेड व हिंगोली रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्गासाठी रेल्वे,सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर पालिका, तहसील व जिल्हाधिकारी कार्यालय व एमआरआयडीसी यांना डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाने सतत निवेदने देणे,आंदोलन करणे आणि फोनवर पाठपुरावा करीत आल्यामुळे शेवटी रस्ता करावाच लागला. 


डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा संघटनेनी मागील दीड ते दोन वर्षांपासून पूर्णेतील भुयारी मार्गाच्या झालेल्या दुरावस्थेविरुद्ध सुरुवातीला नगर पालिका, रेल्वे विभाग  यांना निवदने देऊन रस्ता दुरुस्ती करण्याचे आवाहन केले होते मात्र त्यांनी तो भाग आमच्या अखत्यारीत येत नाही असे सांगून टोलवले होते. नंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देऊन समस्या सोडविण्यासाठी सांगितले मात्र त्यांनी सुद्धा टोलवाटोलवी केली. त्यानंतर संघटनेनी तिघांना संयुक्त निवेदन दिले व तहसीलदारांना निवेदन देऊन याची कल्पना दिली मात्र परत टोलवाटोलवी केल्या गेली. पावसाळ्यात तिथे काही अपघात घडले तरीही कुठल्याच प्रशासनाने याची दखल घेतली नाही. नंतर डी वाय एफ आय ने त्याठिकाणी आंदोलन केले, काही प्रमाणात डागडुजी शिवाय त्यावर उपाय काढण्यात आला नाही. म्हणून डी वाय एफ आय या संघटनेनी जिहाधिकाऱ्यांना निवेदने दिली. शेवटी संघटनेना कळाले त्या जमिनीचे मालक असलेल्या लोकांना रेल्वे विभागाकडून पैसे दिल्या गेले, संघटनेनी रेल्वे विभागाला निवेदन दिले व आंदोलनाचा इशारा दिला, फोन वर सतत पाठपुरावा केला मध्यंतरी जिहाधिकारी यांना निवेदन व मेसेजेस करून कायदा हातात घेण्याची वेळ येऊ नये असे सांगितले. रेल्वे प्रशासनाशी संघटनेनी सतत केलेल्या संपर्कामुळे रेल्वेनी एमआरआयडीसी या संस्थेशी संपर्क झाला व रेल्वे प्रशासन आणि डी वाय एफ आय यांनी एमआरआयडीसी शी केलेल्या सततच्या पाठपुराव्याने शेवटी हा रस्त्या तयार करण्यात आला.

       हा प्रश्न सोडविण्यासाठी डी वाय एफ आय च्या जिल्हा सचिव नसीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष अमन जोंधळे, कोषाध्यक्ष जय एंगडे, तालुकाध्यक्ष सचिन नरनवरे, तालुका सहसचिव अजय खंदारे, शहर अध्यक्ष सुमित वेडे, शहर सचिव संग्राम नजान, शहर कोषाध्यक्ष किरण खंदारे, शहर सहसचिव राज जोंधळे, प्रबुद्ध काळे, पांडुरंग दुथडे, सोमेश जोंधळे, सुबोध खंदारे, शहर उपाध्यक्ष वैभव जाधव, गंगाधर गायगोधने यांच्यासह संघटनेच्या सर्वच सदस्यांनी आपले योगदान दिले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या