💥पोलीस-मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे ‘महाज्योती’चे आवाहन....!


💥अर्ज करण्याचे आवाहन ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे💥

परभणी (दि.20 जानेवारी) : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी औरंगाबाद व नागपूर येथे चार महिन्यांचे अनिवासी स्वरुपाचे पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी इच्छुक उमेदवाराने संस्थेच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने बुधवार, दि. 25 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे.

  या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील असावा. उमेदवार हा किमान 12 वी उत्तीर्ण असावा. इच्छुक विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणादरम्यान पुस्तके, गणवेश देखील देण्यात येणार आहे. तरी महाराष्ट्रातील संबंधित प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या