💥परभणी जिल्हा क्रिडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन.....!


💥त्यासाठी इच्छुकांनी 20 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले💥 

परभणी (दि.17 जानेवारी) : क्रीडा व युवक सेवा संचलनालयांतर्गत 2020-21 आणि 2021-22 या वर्षासाठी जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू, मार्गदर्शकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी 20 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे. 

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडू) आणि क्रीडा मार्गदर्शक यांनी विहीत नमुन्यात हे अर्ज 20 जानेवारी 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, परभणी येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. पवार यांनी केले आहे.

त्यासाठी अर्जदार महाराष्ट्रात सलग 15 वर्षे वास्तव्यास असावा. त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावीत. राज्यात सतत 10 वर्षे क्रीडा मार्गदर्शकाचे कार्य केलेले असावे. गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी प्रत्येकी एका महिला, पुरुष व दिव्यांग खेळाडूने अर्ज करणाऱ्या पुरस्कार वर्षासह लगतपूर्व 5 वर्षांपैकी 2 वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व केले असले पाहिजे, राष्ट्रीय शालेय व केंद्र शासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धामधील राष्ट्रीय स्तरावरील कामगिरीचा विचार होणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या