💥पुर्णेतील जेष्ठ पत्रकार तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय बगाटे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार....!


💥माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला💥

पूर्णा, प्रतिनिधी/

       पूर्णा शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा मुख्याध्यापक विजय बगाटे यांचा विविध पक्ष संघटना संस्था व पथकाच्या हस्ते सत्कार करण्यात आला.जगदंबा विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला.


      कैलासवासी विठ्ठलराव मोरे मूकबधिर अस्थिविंग विद्यालयात कार्यक्रम आयोजित केला होता याप्रसंगी प्रवक्ते मोहनराव मोरे यांच्या हस्ते भेट वस्तू देऊन मुख्याध्यापक विजय बगाटे व सुनीता बगाटे यांचा संस्थे तर्फे सत्कार करण्यात आला

      यावेळी प्राचार्य मोहनराव मोरे यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले की बगाटे यांनी उर्वरित आयुष्य समाजसेवा व धम्मकार्यासाठी खर्च करावे यावेळी पत्रकार जगदीश जोगदंड, अभियंता गौतम वावळे, नारायण जाधव,नागठाणे ,महेश कुलकर्णी प्रियंका बगाटे मुख्याध्यापक नेहरू सोनटक्के यांनी मनोगत व्यक्त केले.

    कार्यक्रमात रिपाई नेते प्रकाश कांबळे गुरु बुद्ध स्वामी संस्थेचे अध्यक्ष मोहन प्रमोद एकलारे रिपाईचे अन्नूत धबाले वंचित चे दादाराव पंडित रेल्वे कर्मचारी संघटनेचे अशोक कांबळे भाजपाचे विजय कराड विनय कराड यांच्यासह आदींनी सत्कार केला.

     प्रमुख उपस्थित होते विश्वनाथ कदम, नाना भुसारे,गणेश वाठोरे, आनंद इंगोले, अभियंता विलास बगाटे, अभियंता अतुल भगत, डिघोळे, गौतम साळवे, संजय भगत, बबन बगाटे अनिल इंगोले, पंडित रणवीर, अनिल शिरसागर शेख नईम शेख गफार, शिवाजी कदम,विमलताई पाटील, विमलबाई दवणे, पवार आदींचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन धनंजय रणवीर यांनी केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या