💥जिंतूर येथील ड्रॉ. योगेश दहिफळे यांचे संजीवन व्यसनमुक्ती केंद्राचा उद्घाटन सोहळा संपन्न....!


💥कृषी भूषण मधुकररावजी घुगे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन💥


जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर येथे डॉ.योगेश दहिफळे यांचे  संजीवन व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन कृषी भूषण मधुकररावजी घुगे यांच्या हस्ते करण्यात आले.याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की जिंतूर येथील प्रसिद्ध डॉ. योगेश दहिफळे यांच्या दहिफळे हॉस्पिटल येथे आज दिनांक 31 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी 07:00 वाजता कृषी भूषण श्री मधुकररावजी घुगे केहाळकर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सूर्यकांत चवंडके तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील नामवंत डॉ. नरेश होलानी, माजी नगराध्यक्ष सखारामजी चिद्रावार, प्रसिद्ध व्यापारी संजय कोकडवार हे होते.

यावेळी डॉक्टर योगेश दहिफळे यांनी प्रस्ताविकात व्यसनमुक्ती मुळे होणारे तोटे व सविस्तर माहिती दिली. तर डॉ. सूर्यकांत चवंडके, डॉ. होलानी, सखाराम चिद्रवार, डॉ. पंडित दराडे, डॉ. कानडकर, डॉ. इरफान पटेल आदींनी व्यसनमुक्ती वर आपापले विचार मांडले.

यावेळी जिंतूर पॅथॉलॉजी लॅबची विजय मोरे, नरसिंग जायभाये, गजानन डहाके, विठ्ठल कामठे, पत्रकार शहरातील डॉक्टर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर यावेळी दहिफळे हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी यांनी  कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हॉस्पिटलचे व्यवस्थापक रामदास वाघ यांनी मानले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या