💥शेतकऱ्यांसाठी खुशखबर : शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी तब्बल 700 कोटींचा निधी मंजूर....!


💥कर्जमुक्ती योजनेचा 'या' शेतकऱ्यांना मिळणार लाभ💥

✍️ मोहन चौकेकर 

सरकारने शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. मागील महाविकास आघाडी सरकारनं सत्ता स्थापन केल्यानंतर, सर्वप्रथम शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. आता शेतकऱ्यांबाबत शिंदे-फडणवीस सरकारने मोठी घोषणा केली आहे. 

शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी राज्य सरकारने 700 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत या कर्जमाफीची घोषणा केली होती. आज अखेर या योजनेसाठी 700 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आला आहे. 

या योजनेचा लाभ नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी 2017-18, 2018-19 आणि 2019-20 हा कालावधी सरकारने विचारात घेतला आहे. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. 2018-19 मध्ये अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई दिली आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील लाखों शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या