💥हिंगोली जिल्ह्यातील महिला वनरक्षक रुजिता शेलार ह्या वन दुर्गा 2022 या पुरस्काराने सन्मानित....!


💥एक्सप्लोरिंग वूमनहूड फाउंडेशनच्या तीने देण्यात आला 'वनदुर्गा' सन्मान💥


शिवशंकर निरगुडे : हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील येलदरी येथील  वनरक्षक रुजिता शेलार यांना वने व वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन मधील उत्कृष्ठ कार्याबद्दल वनदुर्गा 2022 ह्या पुरस्काराने नागपूर येथे सन्मानित करण्यात आले आहे. 


महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर झाले;मात्र लोकसभेत मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे भारतीय महिलांचा राजकारणातील प्रवेश सुकर होईल. अद्याप तो दिवस उगवलेला नाही. कारण आजही या विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळालेली नाही. केवळ पंचायत स्तरावर महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळाले. त्याच धर्तीवर सर्वच विभागांमध्ये महिलांना आरक्षण मिळावे, असे प्रतिपादन नागपूर मॅटचे उपाध्यक्ष श्री. भगवान यांनी केले. एक्सप्लोरिंग वूमनहूड फाउंडेशनच्या 'वनदुर्ग सन्मान २०२२' पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. एस. मिश्रा, सेवानिवृत्त उपवनसंरक्षक रवींद्र वानखेडे, ज्येष्ठ सनदी लेखापाल डॉ. तेजिंदरसिंग रावल, फाउंडेशनच्या संचालिका दीपाली देवकर उपस्थित होते. तत्पूर्वी हिंगोली येथील वनरक्षक रुजिता शेलार, शोभा वाघचौरे, वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती बावणे (महेशकर), सीमा किशोर मिश्रीकोटकर, प्राइड ऑफ पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक  लक्ष्मी यांच्या नेतृत्वात चमूला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. भगवान पुढे म्हणाले, भारतात पुरुष प्रधान संस्कृती आहे. काळ बदलला तरी अशी अनेक प्रकरणे समोर येतात ज्यात महिलांना पुरुषांपेक्षा कमी समजले जाते. १९९९ मध्ये महिलांना नोकरीत ३० टक्के आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात आला. अद्याप अनेक विभागांमध्ये ३० टक्के महिलांची भरती झालेली नाही. शासकीय सेवेत येण्यासाठी महिलांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. चंद्रपुरात कार्यरत असताना महिलांना वनविभागात घेण्यासाठी आग्रही होतो.मी निवडलेल्या महिलांपैकी एकीला पुरस्कार देण्यात आल्याने निर्णयाचे सार्थक झाल्याची भावना भगवान यांनी व्यक्त केली. सेवानिवृत्त अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. एस. मिश्रा, सेवानिवृत्त उपवनसंरक्षक रवींद्र वानखेडे, ज्येष्ठ सनदी लेखापाल डॉ. तेजिंदरसिंग रावल यांनी मार्गदर्शन केले. सीमा किशोर मिश्रीकोटकर यांनी वन विभागात पतीने केलेल्या उल्लेखनीय कार्याचा उल्लेख केला. हा गौरव माझा जरी असला तरी खरे सत्काराचे मानकरी पतीच असल्याचे त्यांनी सांगितले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या