💥कर्जाचा हप्ता वाढणार ? रिझर्व्ह बँकेने केली रेपो दरात वाढ....!

💥रिझर्व बँकेने रेपो दरामध्ये 35 बेसिस पॉईंट्स ची वाढ केली असल्याने आता रेपो दर 6.25 टक्क्यांवर गेला आहे💥

✍️ मोहन चौकेकर 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. कारण आता तुमच्या कर्जाचा हप्ता महागणार आहे. आज रिझर्व बँकेने रेपो दरामध्ये 35 बेसिस पॉईंट्स ची वाढ केली असल्याने आता रेपो दर 6.25 टक्क्यांवर गेला आहे. यामुळे कर्ज घेणार महागणार आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज बुधवारी पतधोरण धोरण जाहीर केले. यावेळी रेपो दरात 35 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. यामुळे रेपो दर 6.25 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे आता पुढील काळात कर्ज घेताना ते महागणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, आरबीआय आर्थिक वृद्धीवर लक्ष केंद्रित करत असून अर्थव्यवस्थेचा वेग मंदावल्याने आणि महागाईमुळे चलनवाढ कमी होण्याचे संकेत दिसू लागल्याने रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीने कर्जदरात 35 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदर 35 बेसिस पॉइंट्सने वाढवून 6.25% केला आहे.

जगभरातील मध्यवर्ती बँकांना महागाई विरोधात समतोल साधताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. फक्त भारतातच नव्हे तर इंग्लंड, अमेरिकेसारख्या देशात देखील महागाई खूप वाढली आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीने जूनपासून मागील 3 बैठकांमध्ये कर्ज दर प्रत्येकी 50 बेसिस पॉइंट्सने वाढवला होता. जर आपण किरकोळ महागाई दर पाहिला तर तो ऑक्टोबरमध्ये 6.77 टक्क्यांवर होता, जो आरबीआयच्या अंदाजापेक्षा जास्त होता.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या