💥धार्मिक कार्क्रमांमध्ये होणारा अतिरिक्त खर्च टाळून गावातील शैक्षणिक उत्कर्षासाठी वापरा - अमृतराज कदम


💥आदर्श शिक्षकांचा सन्मान;विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप💥

पुर्णा (दि.३१ डिसेंबर) - तालुक्यातील धानोरा काळे येथील प्राथमिक शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत सामान्य ज्ञान सापर्धेतोल विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षक यांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी देऊळगाव येथील उपक्रमशील शिक्षक बळीराम कदम यांना दीपस्तंभ फाऊंडेशन चा आमदार उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते राजभवनात सन्मानित करण्यात आले तसेच फुकटगाव येथील अबनराव पारवे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.


                कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून गूरुबुद्धी स्वामी कॉलेज चे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते अमृतराज (दादा) कदम यांनी आपल्या मार्गदर्शनात प्रत्येक गावाने धार्मिक कार्यक्रमावरील खर्च कमी करून तो गावातील शैक्षणिक उत्कर्षासाठी वापरावा,सप्ताह समारंभ जरूर करावेत परंतु त्याच्यावर होणारी खर्चाची उधळ पट्टी न  करता ते साध्या पद्धतीने करून तो खर्च गावातील शैक्षणिक उत्कर्षासाठी वापरावा असे तळमळीने सांगितले.

 सत्कारमूर्ती उपक्रमशील शिक्षक बळीराम कदम यांनी मार्गदर्शन करताना प्रा. शा. धानोरा काळे शाळेला घड्याळ व कॅलेंडर भेट देत वेळ व काळ याचे महत्त्व जीवनात फार मोठे आहे तसेच त्यांच्या देऊळगाव शाळेतील प्रगतीचा इतिहास व अनुभव विद्यार्थी व पालकांसमोर मांडले पुढे बोलताना म्हणाले की चांगले काम करत असताना काही वाईट काही चांगले अनुभव येतात माणसाने वाईट अनुभव आले म्हणून आपल्या हातचे चांगले काम करणे सोडून देऊ नये व आपले चांगले कार्य सतत पुढे चालू ठेवावे असे मत व्यक्त केले.

आदर्श शिक्षक बबनराव पारवे यांनी मार्गदर्शनात पुरस्कार मिळाल्यानंतर जबाबदारी दुप्पट वाढते दुप्पट वेगाने काम करावे लागते माझ्या कार्याची दखल घेत मला पुरस्काराणे सन्मानित केले आहे ते आपले सहकारी व माझ्या शाळेतील विद्यार्थी यांना समर्पित असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोपात प्र.मुख्याध्यापक पी.जी.डुकरे यांनी प्रताप काळे यांच्या कार्याचा उलेख करत शाळेत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवल्या बद्दल व बक्षीस वितरणसाठी दर महिन्याला विद्यार्थ्यांना भरघोस बक्षिसे शिक्षण प्रेमिंकडून उपलब्ध केल्याने विद्यार्थ्यांत शिक्षणाची आवड निर्माण झाल्याचे मत व्यक्त केले.यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीराव काळे,संजीवनी शाळेचे श्री.हिंगे,दिलीप काळे,गजानन ढवळे,जनक काळे,के.के. फुडस चे कृष्णा काळे,वैजनाथ काळे,कमलबाई काळे,विश्वनाथ काळे,मोतीराम काळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सावळे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष प्रताप काळे यांनी मानले यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक सचिन खोसे,विनोद मेडेवाड,त्र्यंबक स्वामी,बळीराम पिल्लेवाड,आनंद डूमने, शिक्षिका वंदना पौळ,राधा होळकर, प्रांजल बांगरे यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या