💥परभणी जिल्ह्यातील सर्व पशुपालक शेतकऱ्यांना लम्पी नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध....!


💥ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.पी.पी.नेमाडे यांनी केले आहे💥

परभणी (दि.३० डिसेंबर) : जिल्ह्यातील सर्व पशुपालक शेतकऱ्यांनी लम्पी चर्मरोगाने मृत्यूमुखी पडलेल्या पशुधनाच्या नुकसान भरपाईसाठी संकेतस्थळ आणि गुगल प्ले स्टोअरवरील मोबाईल अँपवर ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी.पी.नेमाडे यांनी केले आहे. 

 पशुपालकांसाठी  डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूमहापशुआरोग्यडॉटकॉम  (www.mhpashuaarogya.com) या संकेतस्थळावर आणि Google play स्टोअरवर पशुसहायता (PASHU SAHAYATA) हे मोबाईल अँप तयार करण्यांत आले आहे. लम्पी चर्मरोगाने मृत्यूमुखी पडलेल्या पशुपालकांनी या संकेतस्थळावर किंवा मोबाईल ॲपवर ऑनलाईन नोंदणी करावी. ऑनलाईन अर्ज करताना पशुपालकांनी स्वतःच्या मोबाईलचा वापर करावा.  नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही परिस्थितीत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नेमाडे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या