💥आंतरशालेय सांस्कृतिक स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासाचे प्रवेशद्वार....!


💥श्री.केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य जयंत  दिग्रसकर यांचे प्रतिपादन💥

सेलू (दि.07 डिसेंबर) - जीवनात स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व असुन यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने सहशालेय स्पर्धेत भाग घेवून आपल्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असले पाहिजे असे प्रतिपादन श्री.केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य जयंत दिग्रसकर यांनी केले.श्री केशवराज बाबासाहेब विदयालयात आयोजित आंतरशालेय सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.या स्पर्धेत रंगभरण,सामान्य ज्ञान,चित्रकला आणि निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी दत्ताराव मंडलिक,श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिराचे पुजारी केशवराव मंडलिक,माजी मुख्याध्यापिका आश्रावंती हिवाळे,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप कौसडीकर,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष नावकर आदि मान्यवरांची उपस्थिती होती पुढे बोलताना ते म्हणाले की,शाळा विकासासाठी कटिबद्ध असणे आवश्यक आहे यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया शिक्षकांचे सहकार्य या साठी हमखास मिळते असे ते म्हणाले तसेच आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत,की आपल्याला केशवराज बाबासाहेब महाराजांच्या पावन भूमीत काम करण्याची संधी मिळाली आहे.या संधीचे सोने करून आपण विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडवले पाहिजे असेही जयंत दिग्रसकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश कुलकर्णी, सुत्रसंचलन सुचिता पितळे तर आभार योगेश ढवारे यांनी मानले.यावेळी विविध शाळेतील शिक्षक व पालकांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या