💥नवीन शैक्षणिक धोरणात स्वायत्ततेला प्राधान्य - प्राचार्य डॉ.महादेव गव्हाणे


💥स्वा.सै.सूर्यभानजी पवार महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटक प्रसंगी बोलत होते💥


पूर्णा (दि.०७ डिसेंबर) - प्रतिनिधी- नवीन शैक्षणिक धोरणात महाविद्यालयांना स्वायत्ततेसाठी प्राधान्य देण्यात आले असून महाविद्यालयाने उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी ही प्रोत्साहनही असल्याचे प्रतिपादन राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव गव्हाणे यांनी केले. ते येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणावर(NEP) आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटक प्रसंगी बोलत होते.


नवीन शैक्षणिक धोरणावरील वेगवेगळ्या मुद्द्यावर त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विवेचन केले.प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ. डी.एन.मोरे यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील कायद्याने ग्रामीण भागातील महाविद्यालयाचे विद्यार्थी, संस्थाचालक, महाविद्यालये यांचा कस लागणार असून शैक्षणिक फीस आणि आर्थिक पर्यायावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन करतांना सांगितले की वाडी - तांडे- आदिवासी भागातील व मागासवर्गीय सामान्य घरातील मजूर, कष्टकरी पालकांची मुले यापुढे शिक्षण घेतील की नाही यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. या कार्यशाळेत नवीन शैक्षणिक धोरणावर अनेक प्रश्न उत्तरांवर यावेळी चर्चा करण्यात आली.या कार्यशाळेचे प्रस्ताविक संस्थेचे संस्थापक सचिव तथा कार्यशाळेचे संयोजक प्रोफेसर डॉ.रामेश्वर पवार यांनी केले.  कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयाचे कोषाध्यक्ष उत्तमराव कदम हे होते. 

या कार्यक्रमांमध्ये अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ.वसंत भोसले, डॉ.नरेंद्र चव्हाण, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परभणी उपकेंद्राचे संचालक डॉ.बी.के. शिंदे यांनीही सविस्तर असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी  विचारमंचावर श्री. गुरु बुद्धिस्वामी शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रा.गोविंद कदम ,सचिव अमृत राज कदम ,अनुसया शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव प्रोफेसर डॉ.रामेश्वर पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अधिसभा व विद्या परिषद- 2022 च्या निवडणुकीत नवनिर्वाचित झालेले अधिसभा सदस्य डॉ. कुसुमताई पवार, प्राचार्य डॉ. रावसाहेब जाधव, डॉ.बी.एस सुरवसे,दिलीप कुमार बोईनवाड डॉ.शालिनी कदम, डॉ.सूर्यकांत जोगदंड डॉ.अशोक मोटे, डॉ.ए.टी. शिंदे, डॉ.विष्णू पवार, डॉ.दिलीप पाईकराव, डॉ.अशोक टिप्परसे, डॉ. संतराम मुंडे,डॉ. महेश बेंबडे , डॉ. करुणा देशमुख, नारायण चौधरी, विक्रम पतंगे, युवराज पाटील, विनोद माने,महेश मगर,अजय गायकवाड,आकाश रेजितवाड, हनुमंत कंधारकर, शितल सोनटक्के,डॉ. रामेश्वर पवार,डॉ. विजय भोपाळे तसेच विद्या परिषदेचे सदस्य डॉ. अंबादास कदम, डॉ.एल.पी.शिंदे, डॉ.अशोक मोटे,डॉ. सुरेखा भोसले, तत्त्वज्ञान अभ्यास मंडळाचे सदस्य  डॉ.प्रभाकर किर्तनकार आदी मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोफेसर डॉ.संजय कसाब यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संतोष कुऱ्हे यांनी मानले. या कार्यशाळेत अनेक महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या