💥पुर्णा तालुक्यातील गौर ग्रामपंचायतीतील प्रस्थापितांची मक्तेदारी संपवण्यासाठी एकटवली गोरगरीब जनता अन् नवयुवक....!


💥नवयुवक पॅनलला जनताजनार्धन देणार खंबीर पाठबळ💥


परभणी : जिल्ह्यातील पूर्णा तालूक्यातील गौर गाव हे पूर्णा-नांदेड रोडवरील जागृत सोमेश्वर मंदिर देवस्थान  म्हणून सर्वदूर परिचित आहे.या गावात मोठ्या संख्येने असलेले सर्वच धर्माचे नागरीक गुण्यागोविंदाने वास्तव्य करुन राहतात.त्याचबरोबर येथे सर्वच पक्षाचे मात्तब्बर पुढारीही आहेत.मात्र येथे अनेक वर्षापासून घराणेशाही आणि प्रस्थापीतांची ग्रामपंचायतीवर सत्ता असूनही गावाचा म्हणावा तसा सर्वांगीण ग्रामविकास झाला नसल्याचा गावकरी सांगतात. त्यामुळेच ज्यांच्या हाती ग्रामपंचायतवर मक्तेदारी व एक हाती सत्ता असणाऱ्या प्रस्थापित जुन्या खोडांना येथील १८ डिसेंबर २०२२ रोजी होऊ घातलेल्या पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणूकीत पराभूत करण्यासाठी येथे गावातील बहुसंख्य गोरगरीब जनता शेतकरी,नवयुवक एकाविचारांती एकवटून त्यांनी प्रस्थापित मक्तेदारी आणि घराणेशाही संपूष्टात आणण्यासाठी सुशिक्षितांचा तगडा पॅनल तयार करत थेट जनतेतून निवडल्या जाणाऱ्या सरपंच पद जेकी आनूसुचित प्रवर्गाकरीता आरक्षित आहे आणि उर्वरित ११ सदस्य पदाकरिता तारीख २ डिसेंबर २०२२ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करुन आव्हान दिले आहे.त्यामुळे प्रस्थापित मक्तेदारी करणा-यांच्या पायाखालची वाळू सरकत.जस जसी मतदानाची तारीख जवळ येईल तसतशी नवयुवक पॅनलच्या बाजुने जनताजनार्थन येण्याची दाट शक्यता असल्याचे गावातील जनतेच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे.या पॅनलच्या प्रमुखांनी निक्षून सांगितले आहे की,गावातील सुजान जाणत्या मायबाप नागरीकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या भक्कम पाठबळ देऊन विजयी केले तर आम्ही येत्या पाच वर्षात जे आजवर झाले नाही ती सर्व विकास कामे करुन गावाचा कायापालट करु,परंतु असे असतानाही जुने प्रस्थापित धनकुबेराची लालूच दाखवून लोकांची मने जिंकू शकतील?असेही गावातील जनता बोलून दाखवत आहे.एकंदरीत येथील ग्रामपंचायत निवडणूक ही गुलाबी थंडीच्या वातावरणात मजेदार रंगणार असल्याचे चिन्ह आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या