💥जिंतूर शहरात भागवत कथेची शोभायात्रा उत्साहात संपन्न....!


💥शहरातून प्रचंड प्रतिसाद : जय श्रीराम घोषणेने शहर दनाणंले💥 


जिंतूर प्रतिनीधी / बि. डी. रामपूरकर 

जिंतूर (दि.०९ डिसेंबर) - आयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यास ट्रस्ट चे कोषाध्यक्ष आणि मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी न्यास ट्रस्टचे उपाध्यक्ष आचार्य गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या भागवत कथेला भव्य शोभा यात्रेने आज प्रारंभ झाला आहे या शोभायात्रेत भाविक भक्त भजनी मंडळ,आ.मेघनाताई साकोरे बोरडीकर माता भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


जिंतूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर भागवत कथा ज्ञान यज्ञ आयोजित करण्यात आला असून यानिमित्त आज प्रथम दिनी सकाळी नऊ वाजता गणेश नगर येथून भव्य शोभा यात्रेला प्रारंभ झाला या शोभायात्रेत अश्वारूढ ध्वज पताका भगवे ध्वज दिंडी लेझीम आणि तेरढोकी येथील हभप रघुनंदन महाराज यांच्या आश्रमातील बाल कलाकार वारकरी पथक सहभागी झाले.

  शहरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती लाल साडी परिधान करून मंगल कलश घेऊन तर पुरुष भक्त मंडळी शुभ्र वस्त्र धारण करून मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाले सुंदर अशा अश्व रथामध्ये आचार्य गोविंद देवगिरी महाराज स्वार होऊन शोभा यात्रेत सहभागी झाले  याच बरोबर स्वामी महेश महाराज जिंतूरकर भागवताचार्य संदीप भाई शर्मा यांच्यासह तालुक्यातील संत महात्मे भक्त मंडळी भजनी मंडळी व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले शहरातील प्रमुख मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्ग येलदरी रोडने संत भगवान बाबा चौकातून नरसिंह चौक मार्ग ही शोभायात्रा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभामंडपात पोहोचली यावेळी शहरातून दुकाने प्रतिष्ठाने आणि घरासमोर पुष्पवृष्टी करून पुष्पहारणे स्वामीजींचे भव्य स्वागत झाले यानिमित्त शहरात रांगोळ्या काढून शहर सजावट करण्यात आले होते तर फटाक्याच्या आतिश बाजी मध्ये या शोभायात्रेत उत्साह भरला जय श्रीराम च्या घोषणाने जिंतूर शहर दणाणून सोडले या मुळे शहरातील वातावरण भागवतमय झाले असून फक्त मंडळींनी भागवत कथेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन कोकडवार परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे ही कथा दररोज दुपारी दोन ते सहा वाजेपर्यंत संपन्न होणार असून यात पंचक्रोशीतील शेकडो भाविक भक्त सहभागी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे भागवत कथेची पूर्ण तयारी झाली असून भव्य दिव्य मंडप सजविण्यात आला असून आकर्षक असे व्यासपीठ आणि स्वामीजींना कथेसाठी विशेष असे कमळाच्या फुलाचे व्यासपीठ उभारले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या