💥गौर ग्रामपंचायतीच्या सत्तेची सुत्र भ्रष्ट बेईमानांच्या हातात देण्याऐवजी सर्वसामान्य इमानदार तरुणांच्या हातात द्या...!


💥युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरीक राम पारवे यांचे गौर ग्रामस्थांना आवाहन💥


पुर्णा (दि.०८ डिसेंबर) - पुर्णा तालुक्यातील गौर जिल्हा परिषद सर्कल मधील सर्वात महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या गौर ग्रामपंचायतीच्या सत्तेची सुत्र मागील काळात अत्यंत भ्रष्ट हातात गेल्यामुळे कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी प्राप्त झाल्यानंतर देखील गौर गावाचा विकास झाला नाही गावातील प्रमुख सार्वजनिक रस्त्यासह गावातील लहान मोठ्या रस्त्यांची काम देखील अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली इतकेच नव्हे तर पाणी पुरवठा योजनेसाठी देखील शासनाने गौर ग्रामपंचायतीला कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर देखील पिण्यासह सांडपाण्याचा प्रश्न सुटलेला नाही बंदिस्त नाल्यांच्या नावावर शासकीय विकासनिधीची मुक्त हस्ते लुट करण्यात आली परंतु नाल्यांचा प्रश्न देखील अद्याप सुटलेला नाही याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे बालवाड्या अंगनवाड्यांसह जिल्हा परिषद शाळेच्या विकासावर देखील लाखो रुपयांच्या निधीचा घोळ करण्यात आला.


पुर्णा-नांदेड राज्य महामार्गावर असलेले साडेचार ते पाच हजार लोकसंख्येचे गौर गाव श्री.सोमेश्वर महादेव देवस्थानामुळे प्रसिध्द असून या गावातील देवस्थानाच्या बारवाच्या विकासाच्या नावावर देखील शासकीय निधी गिळकृत केला गेला अश्या भ्रष्ट कारभाऱ्यांच्या हातात गौर ग्रामपंचायतीच्या सत्तेची सुत्र पुन्हा देणार काय ? असा प्रश्न येथील प्रतिष्ठित नागरीक तथा तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते तथा युवा राम पारवे यांनी उपस्थित केला असून गौर गावातील सुजान मतदारांनी मागील काळात भ्रष्ट कारभार चालवणाऱ्यांच्या हाती आता पुन्हा ग्रामपंचायतीचा कारभार जाता कामा नए या दृष्टीने मतदान करून इमानदार तरुण पिढीच्या हातात सत्तेची सुत्र सोपवावी असे आवाहन केले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या