💥विद्यानिकेतन विद्यालय/महाविद्यालय कोळसा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन....!


💥यावेळी संस्थाध्यक्ष बेंगाळ यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले💥


✍🏻शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

विद्यानिकेतन प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कोळसा येथे 6 डिसेंबर 2022 मंगळवार रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनंम्र अभिवादन करण्यात आले. 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ,उपाध्यक्ष आनंदीताई बेंगाळ, सचिव अंकुशराव बेंगाळ, उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.अभिषेक भैया बेंगाळ, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शिंदे आर.बी. प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सरकटे व्ही.एस. आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.बाजगिरे बी.जी. संस्थेचे पर्यवेक्षक कसाब पी.पी.उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र सांगीतले, त्यांच्या भाषणातून शिका ,संघटित व्हा ,संघर्ष करा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूलमंत्र सांगितल्या गेला खरोखरच हा मूलमंत्र खरा ठरला हे विद्यार्थ्यांच्या भाषणातून लक्षात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.काळे बी.के. व आभार श्री. रोकडे ए.एस. यांनी मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या