💥परभणी शहरात तिब्बतीयन नागरिकांकडून विश्व मनावधिकार दिन साजरा.....!


💥आजच्याच दिवशी ३३ वर्षांपूर्वी तिब्बतीयन धर्मगुरू परमपावन दलाई लामा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता💥

परभणी - शहरात मागील अनेक वर्षांपासून स्वेटर विक्री करण्यासाठी तिब्बतीयन नागरिक येत असतात. आज दि. १० डिसेंबर हा विश्व मनावधिकार दिन तसेच आजच्याच दिवशी ३३ वर्षांपूर्वी तिब्बतीयन धर्मगुरू परमपावन दलाई लामा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. या दोन्ही घटनानाचे औचित्य साधून शहरातील सिटी क्लब मैदानावरील तिब्बतीयन मार्केट मधील तिब्बतीयन नागरिकांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता.

तिब्बत मध्ये चिन द्वारे नेहमीच तिब्बतीयन नागरिकांच्या मानवाधिकारांचे हनन होत आहे. तिब्बत स्वतंत्र लढया मध्ये आज पर्यंत १७५ लोकांनी आत्मदहन करून स्वतः ची जीवनयात्रा संपवली आहे, त्यात बौद्ध भन्ते, महिला, पुरुष व युवकांचा सहभाग आहे.

आज झालेल्या कार्यक्रमात कोर ग्रुप फॉर तिब्बतीयन कॉज चे क्षेत्रीय संयोजक श्री. संदेश मेश्राम व भारत-तिब्बत मैत्री संघाच्या सदस्या श्रीमती शांताताइ उखळकर जैन यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके पाटील, विजय खिस्ते व सचिन रसाळ इत्यादी उपस्थित होते.  उपस्थितांना आयोजकांकडून तिब्बतीयन धर्मगुरू दलाई लामा यांची प्रतिमा भेट देण्यात आली.

तिब्बतीयन स्वेटर सेलर्स चे लेडुप्प डोरजे,केलसंग, श्रीलिंग वागचुडू, श्रीमती यांगी, थुपदेव लिंगजे, श्रीमती रोशी इत्यादी सह तिब्बतीयन नागरिक मोठ्या संख्येने उपास्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या