💥परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात स्टाफ तात्काळ वाढवण्यात यावा....!


💥रुग्णहक्क संरक्षण समितीकडून जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी💥

परभणी (दि.30 डिसेंबर) : परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांसह परिचारिका किंवा अन्य रिक्त पदे तातडीने भरावीत व रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी रुग्ण हक्क संरक्षण समितीने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

           परभणी जिल्हा रुग्णालयातील ओपीडीतील रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. परंतु, एवढ्या मोठ्या प्रमाणावर ओपीडी रुग्णांची संख्या असतांना वैद्यकीय अधिकार्‍यांसह नर्सेस व अन्य कर्मचार्‍यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना तातडीने उपचार किंवा अन्य सुविधा उपलब्ध होवू शकत नाहीत, असे दुर्देवी चित्र आहे. त्यामुळे रुग्णालयात नेहमीच अनुचित प्रकार घडू लागले आहेत. ते प्रकार तातडीने थांबविण्याकरीता कर्मचार्‍यांची संख्या वाढविणे व विविध विभागातील मशनरी तातडीने कार्यान्वित करणे गरजेचे आहे, असे मत जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, अनिता सरोदे, सचिव डॉ. सुनील जाधव, सलिम इनामदार, सय्यद खदीर, प्रशांत वाटूरे, खय्युम बेग, रमेश घनघाव, सुरेखा खिल्लारे, सतीश धोत्रे, रवी साबळे आदींनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या