💥हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील साखरा येथील मध्यवर्ती बँकेत दुष्काळी अनुदान उचलण्यासाठी गर्दी....!


💥बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरील पैसे अद्यापही पडले नाहीत💥


शिवशंकर निरगुडे : हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत दुष्काळी अनुदान जमा झाले आहे. हे अनुदान उचलण्यासाठी लाभार्थी शेतकरी बँकेत  मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहेत. सेनगाव  तालुक्यातील साखरा  व परिसरातील हिवरखेडा . केलसूला .उटी ब्रम्हचारी .धोतरा बोरखेडी. जयपूर. घोरदरी.या सह  आदी गावांमध्ये नुकसान झाले होते  जून, जुलै महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले होते.


 
अतिवृष्टीमुळे साखरा परिसरातील शेतकऱ्यांचे सोयाबीन, तूर, मूग, उडीद,  आदी खरीप  पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन प्रशासनाने  दिले होते. त्यानुसार शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान जमा केले आहे;परंतु बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरील पैसे अद्यापही  पडले नाहीत  

 मागच्या दहा ते पंधरा दिवसा पासून साखरा  येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दुष्काळी अनुदान, पीकविमा,  अनुदान उचलण्यासाठी लाभार्थी शेतकरी गर्दी करताना पाहायला मिळत आहे. साखरा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेल्या पंधरा दिवसा पासून खूपच गर्दी पाहायला मिळत आहे 

आज जयपूर येथील एक वय वृद्ध शेतकरी  डिंगाबर फुंड हें बँकेतील पैसे काढण्यासाठी लाईनला लागले होते मात्र  व्यक्तीला अचानकपणे फिट येऊन ते जागण्यावरच कोसळले होते त्याना तेथील ग्रामस्थांनी उचलून सावलीला नेले व पाणी पाजले तब्बल दहा ते पंधरा मिनिटांनी त्याला होश आला होता साखरा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत व्यवस्थित पणे नियोजन नसल्याने हि गर्दी होत आहे गावनुसार यादी लाऊन दुष्काळी अनुदान  वाटप  करण्यात यावे अशी मागणी या भागातील ग्रामस्थांकडून केली जात साखरा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चुकीच्या नियोजनमुळे हि गर्दी पाहायला मिळत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या