💥जिंतूर तालुक्यात राष्ट्रीय ग्राहक दिन 'जागरण पंधरवाडा' म्हणुन साजरा करा....!


💥अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तहसीलदारांना निवेदन💥 

जिंतूर  प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.१६ डिसेंबर) - प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी येत्या २४ डिंसेबर रोजी जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने १५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ या दरम्यान 'ग्राहक जागरण' पंधरवाडा साजरा करण्यात यावा, यासाठी संबंधीत यंत्रणेला सुचना देण्यात याव्यात या मागणीसाठी जिंतूर तहसीलदार सखाराम मांडवगडे यांना शुक्रवार १६ डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष गुलाबराव शिंदे,उपतालुकाअध्यक्ष ज्ञानेश्वर रोकडे, महिला अध्यक्षा आशाताई खिल्लारे,सुमनताई प्रधान,शहरअध्यक्ष दिलीप देवकर,महेश देशमुख यांच्यासह अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे सदस्य उपस्थित होते. 

               जिंतूर तालुक्यातील ग्राहक नागरिकांना आपले हक्क अधिकार यांची माहिती होण्यासाठी शासनाकडून 'ग्राहक जागरण' दिनाचे आयोजन करून शासनाकडुन ग्राहकांसाठी राबविण्यात येणारी आवश्यक असलेली सर्व माहिती,अधिकार,हक्क या बाबीचा समावेश असावा. यासाठी कॉलेज, शाळा, व वस्त्या, उपवस्त्या, ग्रामीण भागातील छोटी मोठी खेडी, गांव, तांडे अशा सर्व ठिकाणी ग्राहक जागरणाचे कार्य करण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यात यावे, यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तसेच ग्राहक चळवळीतील कार्यकत्यांना सोबत घेऊन पथनाटय, निबंधस्पर्धा, महिलामंडळ विविध स्पर्धा, शेतकरी मेळावे, अशा उपक्रमांव्दारे व्यापक जनसंपर्क करून ग्राहक जागरणाचे कार्य करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. ग्राहक जागरण पंधरवडा मध्ये नव्याने आलेला ग्राहक संरक्षण कायदा, अन्न सुरक्षेच्या बाबतीत वैविध माहिती ग्राहकांना पुरविणे, नव्याने आलेल्या तंत्रामुळे ग्राह गच्या मला आवडीची झालेली ऑनलाईन व त्यातील फसवणुकीपासुन कसे सावध राहावे, या संबंध माहिती दैनंदिन जीवनात उद्भवणाऱ्या खरेदी संबंधी विविध कायदयाची माहीती, वैध-मापण शास्त्र व संबंधीताच्या मुलभुत अधिकारांची माहीती इत्यादी बाबींचा जागरण उपक्रमांमध्ये समावेश आसावा. या प्रमाणे तालुक्यात ग्राहक दिन जागरण पंधरवाडा साजरा करावाच्या अनुषंगाने नियोजन करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिंतूर च्या वतीने करण्यात आली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या