💥जिंतूर शहरातून मोबाईल कंपन्यांचे ऑप्टिकल फायबर केबल रोड फोडून केबल टाकण्याचे काम बंद करावे....!


💥अशी मागणी मा.नगरसेवक उस्मान का पठाण यांनी जिल्हाधिकारी व आयुक्त औरंगाबाद यांचे कडे केली💥 

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर शहरात सध्या मोबाईल कंपनीचे ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू असून ते न. प. जिंतूर कडून नव्यानेच तयार करण्यात आलेले बलसा रोड, ईदगाव परिसर, भुजंगवाडी, पोस्ट ऑफिस रोड, इत्यादी परिसरातील रोड फोडून केबल टाकण्याचे काम करण्यात येत असल्यामुळे सदर रोडचे नुकसान होत असल्यामुळे संबंधितांची काम तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक उस्मान का पठाण यांनी जिल्हाधिकारी व आयुक्त औरंगाबाद यांचे कडे  केली आहे.

तसेच सदरील मोबाईल कंपनी चे काम अंडरग्राउंड बोर मारून केल्यास रोडची नुकसान होणार नाही ज्यामुळे रोडचे आयुष्य वाढवून ते जास्त दिवस टिकतील असेही निवेदनात म्हटले आहे. परंतु कंपनीकडून या पद्धतीने काम न करता रोड लगत खूप काम करून नंतर त्यामध्ये केबल टाकून ते मातीने पुजण्याचे काम चालू असल्यामुळे रोडचे आयुष्य घडत आहे. याबाबत तक्रारदार यांनी मुख्याधिकारी व नगर अभियंता नगरपरिषद जिंतूर यांना तक्रार देऊनही त्यांनी गुत्तेदाराविरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही असे निवेदनात म्हटले आहे.

त्याचबरोबर जोपर्यंत बोर करून अंडरग्राउंड केबल टाकत नाही तोपर्यंत सदरचे काम तात्काळ थांबविण्यात यावी नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशी मागणी निवेदनात केली आहे संबंधितांनी ह्यांच्या प्रती माननीय आयुक्त औरंगाबाद यांना दिल्याचे म्हटले आहे. यावर उस्मान खाँ पठाण माजी नगरसेवक यांची स्वाक्षरी आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या