💥सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ : ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला झळ....!


💥उत्पादन शुल्क,राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात💥

✍️ मोहन चौकेकर 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याने भारतीय सराफा बाजारातही त्याचे परिणाम दिसले. लग्नसराईमुळे सोन्याला मोठी मागणी आहे. त्यात सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.

भारतीय सराफ बाजारात रविवारी (ता. 18) सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसले. 22 कॅरेट सोन्याचा दर 50,100 रुपये प्रति तोळा, तर 24 कॅरेट सोन्यासाठी 54,640 रुपये प्रति तोळा मोजावे लागत आहेत.

सोन्याप्रमाणेच चांदीनेही आज चांगलाच भाव खाल्ला. चांदीचे दर रविवारी 69,000 रुपये प्रति किलोवर गेले होते. देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे भाव खालीलप्रमाणे

* सोन्याचे भाव (प्रति तोळा)*

▪️ चेन्नई - 55,160 रुपये

▪️ दिल्ली - 54,640 रुपये

▪️ हैदराबाद - 54,490 रुपये

▪️ कोलकत्ता - 54,490 रुपये

▪️ लखनऊ -54,640 रुपये

▪️ मुंबई - 54,490 रुपये

▪️ नागपूर - 54,490 रुपये

▪️ पुणे - 54,490 रुपये

टीप : उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या