💥गंघखेड रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेमुळे पती आणि पत्नीला मिळाले जीवनदान.....!


💥या घटनेमुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्तव्यदक्षतेचे प्रवासी वर्गातून होत आहे कौतुक💥 

गंगाखेड (दि.15 डिसेंबर) - गंगाखेड रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेमुळे एका पती-पत्नीला जिवदान मिळाल्याची घटना घडली या घटनेमुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्तव्यदक्षतेचे प्रवासी वर्गातून कौतुक केले जात आहे.

या संदर्भात रेल्वे सुरक्षा बलाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहिती अनुसार काल बुधवार दि.14 डिसेंबर 2022 रोजी रात्री 08.15 वाजता गंगाखेड तालुक्याती पिंपरी येथील श्री बालाजी साबळे हे आपल्या पत्नीसह त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पनवेल एक्सप्रेसने पुणे येथे जाण्याकरिता गंगाखेड रेल्वे स्टेशन येथे सोडण्यासाठी आले होते व आपल्या नातेवाईकांना गाडीत बसवीत असतांना त्याचक्षणी गाडी चालू झाल्यामुळे तसेच ते घाबरून गेले व घाईगर्दीत चालत्या गाडीतून प्लेटफॉर्मवर खाली उतरत असतांना त्याच्या पत्नी तोल खाली जाऊन चालत्या गाडीला  लटकत होते त्याचक्षणी कर्तव्यावर उपस्थित असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे फौजदार शेख जावेद व कॉन्स्टेबल पठाण यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांना चालत्या गाडीतून ओढून बाजूला केले व त्यांचे प्राण वाचविले या घटनेमुळे रेल्वे सुरक्षा बलाचे फौजदार शेख जावेद यांना किरकोळ जख्मी झाले होते.

वरील केलेल्या कार्यामुळे साबळे परिवार आणि प्रवाश्यांनी रेल्वे सुरक्षा बळ यांचे आभार मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या