💥परभणीत मराठा सेवा संघाच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय महाअधिवेशनास सुरुवात.....!


💥शहरात जोरदार सायकल रॅलीने अधिवेशनात झाली सुरुवात💥 

परभणी (दि.23 डिसेंबर) - मराठा सेवा संघाच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय महा अधिवेशना निमित्त शुक्रवारी सकाळी सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी तसेच युवकांनी जोरदार सायकल रॅली काढली असुन तसेच महापुरुषांना अभिवादन सोहळा व शोभायात्रा तसेच ग्रंथ दिंडी काढण्यात आली.शहरातील वसमत रस्त्यावरील असोला शिवारातील जिजाऊ मंदिरापासून या सायकल रॅलीस प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनी या रॅलीस हिरवी झेंडी दाखवली.या रॅली नंतर महापुरुषांना अभिवादन सोहळा तसेच शोभायात्रा व ग्रंथ दिंडी काढण्यात आली यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष कांतराव देशमुख सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव भुसारे, मराठा  संघटनांच्या समन्वय समितीचे नेते सुभाष जावळे, प्राचार्य नितीन लोहट, बालाजीराव मोहिते, गजानन जोगदंड, साहेबराव शिंदे, सुशील देशमुख, नवनाथराव जाधव ,प्राचार्य विठ्ठलराव घुले, रुस्तुमराव भालेराव, सुभाष ढगे, अशोक रसाळ, सुधाकरराव गायकवाड, सुनील जाधव, आदी उपस्थित होते. यावेळी जिजाऊ माता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच रॅलीतील युवकांनी विद्यार्थ्यांनी जिजाऊ वंदना म्हटली. तिथून सायकल रॅली सुरुवात झाली.

 या रॅलीतील युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय हो,असा जयघोष केला .त्यामुळे संपूर्ण वसमत रस्ता या सायकल रॅलीने व घोषणांनी दणाणून गेला.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास जवळ या रॅलीचा समारोप झाला .दरम्यान दुपारी तीन वाजता या महाअधिवेशना निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भव्य शोभायात्रा व ग्रंथदिंडी निघणार आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या